0
दौलताबाद- दाभोलकर- पानसरे खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शरद कळसकर याच्या दौलताबादजवळील केसापुरीत गावात सलग तीन दिवस रात्रीतून गावातील आठ ते नऊ कुत्र्यांना विष पाजून मारण्यात आले. चौथ्या दिवशी गुरुवारी मध्यरात्री ग्रामपंचायतीचे कार्यालय पेटवून देण्यात आले. यात कार्यालयातील सर्व महत्त्वाच्या फाइल्स, कागदपत्रे, संगणक, अभिलेख, संगणक जळून खाक झाले.
दौलताबाद किल्ल्याच्या मागे पाच किलोमीटर अंतरावर केसापुरी-रामपुरी हे साधारण दोन हजार लोकसंख्येचे गाव आहे. दोन्ही गावांची मिळून ग्रुप ग्रामपंचायत असून दोन वर्षांपूर्वीच ग्रामपंचायत कार्यालय नव्या इमारतीत स्थलांतरित झाले होते. शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास गावातील काही शेतकरी शेतात पाणी भरण्यासाठी जात असताना ग्रामपंचायतीची इमारत जळत असल्याचे दिल्यावर त्यांनी सरपंच शांताराम वाहुळ, सदस्य रामनाथ सुरासे, ज्ञानेश्वर पवार यांना ही बाब कळवली. अग्निशमन विभागाला ही बाब कळवल्यानंतर त्यांनी धाव घेतली. परंतु तोपर्यंत कार्यालयातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. वाहुळ यांनी फिर्यादीत कृष्णा साबळे, वीरू जाधव, प्रवीण जाधव, रामपुरीचे पोलिस पाटील काकासाहेब गुंजाळ यांनी दोन दिवसांपूर्वी वाद घातला होता. त्यावरून त्यांनीच हा प्रकार केला असावा, असा संशय व्यक्त केल्याचे म्हटले आहे. 

दौलताबाद किल्ल्याच्या मागे पाच किलोमीटर अंतरावर केसापुरी-रामपुरी हे साधारण दोन हजार लोकसंख्येचे गाव आहे.

  • Dog killing by poison and then burnt gram panchayat office in Kesapuri

Post a comment

 
Top