0
मुंबई - मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम भाजप सरकारविरोधात आक्रमक झाले असतानाच त्यांच्याविरोधात आता निष्ठावंत काँग्रेसी एकत्र आले आहेत. माजी खासदार मिलिंद देवरा व दिवंगत गुरुदास कामत यांच्या समर्थकांनी निरुपमांविरोधात दंड थोपटले आहेत. 
राज्याच्या प्रभारीपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची नेमणूक झाल्यानंतर निरुपमांना पदावरून हटवण्यासाठी देवरा व कामत गट सक्रिय झाल्याचे समजते.निरुपमांच्या मनमानी कारभाराविरोधात तक्रार करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष जनार्दन चांदूरकर, भाई जगताप, एकनाथ गायकवाड, नसिम खान, सुरेश शेट्टी, बाबा सिद्दिकी, कृपाशंकर सिंह, अमीन पटेल या नेत्यांनी नुकतीच खरगेंची भेट घेतल्याचे समजते. या भेटीत निरुपमांना पदावरून दूर करण्यासंबंधीचा प्रस्ताव खरगेंपुढे मांडण्यात आला. निरुपम यांच्याऐवजी ‘टीम राहुल’मधील मिलिंद देवरांकडे अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात यावीत, असा या नेत्यांचा आग्रह आहे.सर्व प्रमुख नेत्यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याही भेटीची वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी महाराष्ट्र प्रभारी असलेल्या मोहन प्रकाश यांच्याशी निरुपमांचे चांगले मेतकूट असल्याने त्यांच्याविरोधात तक्रारींची दखल घेतली जात नव्हती. मात्र आता पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे.काँग्रेस-राष्ट्रवादी बैठक आगामी निवडणुकांत आघाडी करण्याच्या हेतूने काँग्रेस व राष्ट्रवादीने समविचारी पक्षांसोबत चर्चेला प्रारंभ केला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या वतीने खा. अशोक चव्हाण, विखे पाटील, तर राष्ट्रवादीच्या वतीने जयंत पाटील, धनंजय मुंडे यांनी आ. कपिल पाटील, डॉ. राजेंद्र गवई व माकपचे अशोक ढवळे यांच्याशी चर्चा केली.
Internal clashes in congress senior workers dont want Sanjay Nirupam

Post a comment

 
Top