0
 • जकार्ता- अाशियातील सर्वात माेठ्या ‘एशियन गेम्स’ स्पर्धेचा रविवारी सांस्कृतिक रंगारंग कार्यक्रमाने समाराेप झाला. यादरम्यान स्थानिक कलाकरांनी माेठ्या उत्साहात नृत्याविष्कार सादर केला. तब्बल १५ दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या समाराेप साेहळ्यालाही चांगलीच रंगत अाली. राैप्यपदक महिला हाॅकी संघाची कर्णधार राणी रामपाल ही या साेहळ्याच्या पथ संचलनात भारतीय संघाची ध्वजवाहक हाेती. तिच्याच नेतृत्वाखाली भारताचा संघ या साेहळ्यात सहभागी झाला. याच साेहळ्यादरम्यान अचानक पावसानेही हजेरी लावली.


  दरम्यान विद्युत राेषणाई अाणि फटक्याच्या अातषबाजीने या साेहळ्याला माेठी रंगत अाली. भारतीय संघाने एशियन गेम्सच्या अातापर्यंतच्या इतिहासात यंदा सरस कामगिरी केली. भारताच्या संघाने प्रथमच या स्पर्धेत ६९ पदकांची कमाई केली. भारताच्या अातापर्यंतच्या ६७ वर्षांतील ही सर्वात्तम कामगिरी ठरली. यामध्ये १५ सुवर्णपदकांचा समावेश अाहे. यासह भारताचा संघ पदक तालिकेमध्ये अाठव्या स्थानावर राहिला.

  यादरम्यान चीन संघाने स्पर्धेतील अापले वर्चस्व अबाधित ठेवले. या टीमने एकूण २८९ पदकांची कमाई केली. यामध्ये १३२ सुवर्णांसह ९२ राैप्य अाणि ६५ कांंस्यपदकांचा समावेश अाहे. त्यापाठाेपाठ जपानचा संघ पदकांचे द्विशतक साजरे करताना दुसरा स्थानावर अाहे.

  यंदा प्रथमच ३१४ गाेल; भारताचे ८० गाेल : 
  यंदा जकार्ता येथील एशियन गेम्स स्पर्धेत हाॅकीच्या इव्हेंटमध्ये विक्रमी गाेल झाले. हाॅकीच्या एकूण सामन्यात विक्रमी ३१४ गाेलची नाेंद झाली. यामध्ये एकट्या कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाचे ७६ गाेलचे याेगदान अाहे. यासह भारतीय संघाच्याही नावे गाेलच्या विक्रमाची नाेंद झाली अाहे. यापूर्वी, २००२ च्या क्वालांलम्पूर येथील पुरुषांच्या हाॅकी स्पधॅेत ३०० गाेलची नाेंद झाली हाेती.

  भारताचे ६५ वर्षीय प्रणव यंदा स्पर्धेतील सर्वात वयस्कर सुवर्णपदक विजेते 
  भारताच्या ६५ वर्षीय प्रणव वर्धन यांनी अापल्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी शनिवारी ब्रिजमधील पुरुष दुहेरीत अापल्या ५६ वर्षीय सहकारी शिवानंदसाेबत सुवर्णपदक पटकावले. यासह त्यांच्या नावे विक्रमाची नाेंद झाली. ते या स्पर्धेत चॅम्पियन ठरलेले भारताचे सर्वात वयस्कर खेळाडू ठरले. तसेच इंडाेनेशियाची १२ वर्षीय बुंगा ही पदक विजेती सर्वात युवा खेळाडू ठरली.

  जपानच्या संघाने केला साेनेरी यशाने शेवट गाेड 
  जपानच्या संघाने यंदाच्या १८ व्या एशियन गेम्सचा शेवट साेनेरी यशाने केला. या संघाने शेवटच्या दिवशी रविवारी समाराेप साेहळ्यापूर्वी ट्रायथलाॅन प्रकारात सुवर्णपदक पटकावले. साताे युका, ताकाहशी युकाे, जमपेई अाणि हाेसाेदाने एक तास ३० मिनिटे ३९ सेकंदांत निश्चित अंतर गाठताना सुवर्णपदक पटकावले.

  पुढच्या स्पर्धेत खाे-खो खेळाचा नव्याने समावेश 
  २०२२ एशियन गेम्समध्ये मराठमाेळ्या खाे-खाे खेळाचा समावेश करण्यात अाला. याला अांतरराष्ट्रीय महासंघाने परवानगी दिली. त्यामुळे अाता या खेळाचा पुढच्या स्पर्धेत नव्याने समावेश करण्यात येईल. यासाठी भारतीय खाे-खाे महासंघाचे प्रयत्न महत्वाचे ठरले अाहेत.

  राष्ट्रपती विडाेडाे यांनी मानले सर्वांचे अाभार 
  इंडाेनेशियाचे राष्ट्रपती जाेकाे विडाेडाे यांनी १८ व्या एशियन गेम्सच्या यशस्वी अायाेजनाबाबत सर्वांचे खास अाभार मानले. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेेच ही स्पर्धा यशस्वीपणे अायाेजित करण्यात अाली, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यादरम्यान समाराेप साेहळ्यात दिली.

  अाता १९ वी एशियन गेम्स २०२२ मध्ये ग्वांगझूला 
  अाता अागामी १९ व्या एशियन गेम्सचे अायाेजन २०२२ मध्ये ग्वांगझू येथे हाेणार अाहे. चीन संघाला या स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली अाहे. ही स्पर्धा १० ते २५ सप्टेंबर २०२२ दरम्यान चीनमधील ग्वांगझू येथे अायाेजित करण्यात अाली.

  जपानची इकी ठरली सर्वाेत्कृष्ट खेळाडू 
  यंदाच्या एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकाचा षटकार मारणारी जपानची युवा जलतरणपटू इकी रिकाकाे ही सर्वाेत्कृष्ट खेळाडू पुरस्काराची मानकरी ठरली. तिने जलतरणातील अापले वर्चस्व अबाधित ठेवताना सहा सुवर्णपदकांची कमाई केली. अशा प्रकारे सुवर्णपदकाचा षटकार ठाेकणारी इकी ही यंदाच्या स्पर्धेतील अव्वल खेळाडू ठरली. यामुळे तिची माेस्ट व्हॅल्युएबल प्लेयर म्हणून निवड झाली. सर्वाधिक सात सुवर्णपदके जिंकण्याचा विक्रम अाजही काेरियाच्या नेमबाज साे जिनच्या नावे अाहे. त्याने १९८२ दिल्ली एशियन गेम्समध्ये सात सुवर्णपदके पटकावली हाेती. त्यानंतर अाता हा पराक्रम जपानच्या इकीला गाजवता अाला अाहे.
  first time India won 69 medals; 19 medals in athletics

Post a Comment

 
Top