अमरावती- जिल्ह्यातील अचलपूर येथे पेट्रोलिंगदरम्यान मंळवारी पहाटे पेट्रोलिंगदरम्यान सहायक पोलिस उपनिरीक्षक शांतीलाल पटेल यांची काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. पहाटे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. चार ते पाच गुंडांनी पटेल यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. पटेल यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले, मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे पोलिस स्टेशनपासून जवळच ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

Post a Comment