0
नाशिक - जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. विकास होत असल्याने जनता आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे भाजपविरोधात निघालेल्या संघर्ष यात्रा असो किंवा हल्लाबोल मोर्चा. तसेच विरोधकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली महाआघाडी असेल, याचा कुठलाही परिणाम भाजपवर झाला नसल्याचे त्यानंतर झालेल्या महापालिका, नगर पालिकांच्या किंवा इतर निवडणुकींच्या निकालातून स्पष्ट झाल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला.
  • शनिवारी नाशिकमध्ये विश्रामगृहावर पत्रकारांशी चर्चा करताना दानवे यांनी विरोधकांकडून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना उत्तरे दिली. महागाई आणि विरोधकांची झालेली महाआघाडी यामुळे भाजपसमोर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अडचणी येण्याची शक्यता आहे का? या प्रश्नावर बोलताना दानवे यांनी स्पष्टपणे नकार दिला. इंधनाची दरवाढ ही आमचे सरकार करत नाही. अांतरराष्ट्रीय बाजारात बॅरलच्या किमती जशा वाढतात तशी ती वाढते, कमी झाल्या की कमीही केली जाते. हे धोरण आम्ही नाही तर काँग्रेस सरकारनेच त्यावेळी अमलात आणले होते. किमती वाढत आहेत ते सत्य असल्याने पेट्रोल-डिझेल जीएसटीत आणण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. त्यासाठी केंद्राची समिती आहे. त्याचे अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री असून त्यात प्रत्येक राज्याचे अर्थमंत्र्यांचाही समावेश आहे. या समितीची लवकरच बैठक लावण्याच्या प्रयत्नात आम्ही असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, काही राज्यांनी आपले कर कमी केले असून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही राज्य ते कमी करत आहेत. जनतेला दिलासा देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी इतर प्रश्नांना देखील या वेळी उत्तरे दिली.

    BJP state president Raosaheb Danve claim about mahaaghadi

Post a comment

 
Top