0
नवी दिल्ली- इस्रोमधील हेरगिरी प्रकरणात शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांना केरळ पोलिसांनी विनाकारण अटक केल्याप्रकरणी ५० लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची गोपनीय माहिती फोडल्याचा व विदेशी शास्त्रज्ञांच्या स्वाधीन केल्याचा नारायणन यांच्यासह दोन शास्त्रज्ञांवर आरोप होता.
  • १९९४ मध्ये हे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर देशभर खळबळ उडाली होती. केरळ पोलिसांनी हा तपास केल्यानंतर प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले. आले. मात्र, यात गैरप्रकार घडल्याचे पुरावे सापडले नव्हते. या कारवाईविरुद्ध नारायणन यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. नंबी नारायणन‌ यांच्या मुलीनेही या प्रकरणात अापल्या पित्यास विनाकारण गाेवण्यात येत असल्याचा अाराेप केला अाहे.Give 50 million compensation to scientist Narayanan: court

Post a comment

 
Top