नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज जम्मू काश्मीरमध्ये भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील स्मार्ट फेंसिंगचे उद्घाटन करतील. ही देशातील पहिलीच स्मार्ट फेंसिंग असेल. अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या या कुंपनामुळे घुसखोरी करणाऱ्यांवर नजर ठेवणे सोपे होईल.दोन टिकाणी लावली स्मार्ट फेंसिंग ही स्मार्ट फेंसिंग कठुआ, सांबा आणि जम्मू जिल्ह्यात पाच-पाच किलोमीटरच्या अंतरावर लावण्यात आली आहे. त्यात थर्मल इमेजर, भूमिगत सेंसर, फायबर ऑप्टिकल सेंसर, रडारसह अनेक अत्यादुनिक उपकरणांचा वापर करण्यात आला आहे. जर या फेंसिंगच्या रेंजमध्ये कोणी आले तर लगेचच त्याची माहिती कंट्रोल रूमला मिळेल आणि शत्रूवर कंठोर कारवाई करता येऊ शकेल. या फेंसिंगमध्ये लावलेल्या उपकरणांवर हवामानाचा काहीही परिणाम होणार नाही.असा आहे पायलट प्रोजेक्ट सध्या हा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवला जात आहे. यश मिळाले तर 198 किलोमीटर लांबीच्या नियंत्रण रेषेवर लखनपूरपासून अखनूरपर्यंत अशी फेंसिंग केली जाईल. राजनाथ सिंह बीएसएफ मुख्यालय पलेरामध्ये एका सोहळ्यात याचे उद्घाटन करतील. सुरक्षेचा आढावा घेऊन ते आंतरराष्ट्रीय सीमेचा दौराही करतील.

Post a Comment