पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पूजा प्रसाद (28, रा.उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पूजाचा विवाह ननक प्रसाद (31) याच्याशी झाला होता. विवाहानंतर हे हे दाम्पत्य भोपर गावातील विठाबाई चाळीत राहत होते. दोघांना एक वर्षाची मुलगी होती. दरम्यान, पूजाचे एका पुरुषासोबत अनैतिक संबंध सुरु असल्याचे ननकला समजले होते. त्याचा या प्रकाराला विरोध होता. मात्र, पूजा ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते.
दोन दिवसांपूर्वीही ननक आणि पूजाचे कडाक्याचे भांडण झाले होते. त्यावरून पूजा प्रचंड संतापली होती. पतीचा राग तिने पोटच्या एक वर्षाच्या चिमुरडीवर काढला. तिने मुलीचा गळा दाबून तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी तिने चिमुकलीचा मृतदेह घराजवळ वाढलेल्या झुडपात फेकून दिला. संध्याकाळी ननक घरी आल्यानंतर त्याला आरती घरात दिसली नाही. त्याने पूजाकडे तिच्याविषयी विचारणा केली. मात्र, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याने मुलगी बेपत्ता असल्याची मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरु केला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.
पूजाचे एका पुरुषासोबत अनैतिक संबंध सुरु असल्याचे ननकला समजले होते.
Post a comment