हैदराबाद- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी गुरुवारी विधानसभा भंग करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली. तेलंगणामध्ये लोकसभा निवडणकीसोबतच विधानसभेची निवडणूक होणार होती. मात्र, राव यांनी विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या ९ महिने आधीच विधानसभा भंग करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. ही शिफारस राज्यपालांनी मंजूर करताच तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) तातडीने १०५ उमेदवारांची यादीही जाहीर करून टाकली. विधानसभेच्या एकूण ११९ जागा असून मावळत्या विधानसभेत सत्तारूढ टीआरएसचे ९०, काँग्रेसचे १३, तर भाजपचे ५ सदस्य होते.

Post a Comment