0
मुंबई- प्लास्टिक वापरासंदर्भात व्यापारी आणि नागरिकांना दिलेली मुभा संपण्याच्या मार्गावर असतानाच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भरारी पथकाने जोरदार कारवाई सुरू केली आहे. मुंबईतील मालाड, चिंचबंदर, मशीद बंदर या ठिकाणच्या अजंठा ट्रान्सपोर्ट, मालाड, पूर्व या गोदामांवर कारवाई करून बंदी असलेला एकूण १ हजार ३५९ किलो प्लास्टिक साठा जप्त केला आहे. या गोदामाला ५ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. दरम्यान, हा माल ट्रकच्या माध्यमातून गुजरातमधून राज्यात आणल्याचे आढळून आले.
  • प्रदूषण नियंत्रण मंडळाचे भरारी पथक व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पथकाने चिंचबंदर येथील मुंगीपा रोडवेजच्या गोदामावर छापा टाकला. त्यात नॉन ओव्हन पॉलिप्रापिलीन व प्लास्टिक पी.पी. बॅगचा (५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या) १ हजार ३ किलोचा साठा आढळून आला. त्यामुळे गोदामाचे सहायक व्यवस्थापक महावीर ओंकारमल शर्मा यांना ५ हजार रुपये दंड करण्यात आला. याच भरारी पथकाला मशीद बंदर भागातील एका दुकानात ४ टनांच्या प्लास्टिकच्या बॅगा आढहून आल्या. या मालावर ईपीआर नंबर नसल्याने तो जप्त करण्यात आल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

    पर्यावरणमंत्री कदम यांची फुलांच्या दुकानांवर धाड 
    पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरातील प्रसाद व फुलांच्या दुकानदारांवर छापा टाकून दंडात्मक कारवाई केली. कदम मंदिरात दर्शनासाठी गेले असताना त्यांना काही भाविकांच्या हातात प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये प्रसाद, हार व फुले दिसली. यासंदर्भात त्यांनी भाविकांना विचारणा केल्यानंतर संबंधित दुकानाबद्दल सांगण्यात आले. या माहितीनुसार, कदमांनी दुकानांची पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या प्लास्टिकचा साठा आढळून आला
    Raid on warehouses in Mumbai; Thousands of kg plastic seized by squad

Post a comment

 
Top