- बीड- माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी केंद्र शासनाला महाराष्ट्रातील जळगाव ते सोलापूर हा लोहमार्ग करण्याचे निर्देशित केले होते. त्यानुसार २०१२ मध्ये सर्वेक्षण पूर्ण झाले होते. आता या मार्गासाठी ९८७ कोटी रुपयांची तरतूद झाली असून चारशे वीस किलोमीटरपैकी १२० किलोमीटरच्या कामास मंजुरी मिळाली आहे. याचबरोबर सोलापूर-जळगाव हा नवीन लोहमार्ग उस्मानाबाद - बीड - जालनामार्गे व्हावा अशी मागणी स्वातंत्र्यसैनिक रेल्वे मागणी आंदोलन समिती बीडच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली आहे. हा लोहमार्ग झाल्यास पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण भारत यातील दळणवळण आणखी सुकर होणार आहे.केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाद्वारे जळगाव-सोलापूर महामार्गाची निर्मितीचे कार्य सुरू आहे. हा मार्ग वर्ष-दोन वर्षांत पूर्ण होऊन वाहतुकीसाठी कार्यान्वित होऊ शकेल. हा मार्ग बीडला जोडून जळगाव-सोलापूर असा प्रस्तावित असून उस्मानाबादपर्यंत या मार्गाच्या निर्मितीस जवळपास हिरवा कंदील मिळाला आहे. बीड ते उस्मानाबाद अंतर केवळ ११२ किलोमीटर असून त्यातील उस्मानाबाद ते येडशीपर्यंत २२ किलोमीटर लोहमार्ग कार्यरत असल्याने येडशी ते बीड हे केवळ ८० किलोमीटरचे अंतरच प्रलंबित राहते. त्यामुळे येडशी ते बीड हा ८० किलोमीटर अंतराचा मार्ग जोडल्यास नगरकडील पश्चिम महाराष्ट्रातील व्यावसायिक व प्रवाशांना यांना दक्षिणेकडे जाणे अधिक सोयीचे होईल. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैशांत बचत होईल. तसेच रेल्वेसाठी मालवाहतूक व प्रवासी वाहतुकीतून उत्पन्नाचा मार्ग खुला होईल, अशी मागणी स्वातंत्र्यसैनिक रेल्वे मागणी आंदोलन समितीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आल्याचे निमंत्रक क्षीरसागर यांनी सांगितले.
दहाच वर्षांत गुंतवणूक फेडणार
जळगाव-सोलापूर हा रेल्वेमार्ग केवळ दहा वर्षांच्या कालावधीमध्ये केलेली गुंतवणूक अधिक पटीने उत्पन्नामध्ये रूपांतरित करणारा आहे. तसेच महाराष्ट्राच्या विशेषतः मराठवाडा विभाग देशाच्या राष्ट्रीय पृष्ठभाग वाहतुकीच्या राष्ट्रीय प्रवाहात येण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. यामुळे मराठवाडा विभागाचा सर्वांगीण विकास होईल आणि आर्थिक संपन्नतेबरोबरच सामाजिक जीवन प्रणालीही गतिमान होईल.
तुळजापूर- शिर्डीही जाेडले जाईल
महाराष्ट्रातील तुळजापूरचे तुळजाभवानी संस्थान व शिर्डीचे साईबाबा ही दाेन्ही तीर्थस्थळे नगर-बीड-तुळजापूर असे अतिशय कमी अंतराने जवळ येणार अाहेत. कर्नाटकात तुळजाभवानीचे अाणि साईबाबांचे भक्त माेठ्या प्रमाणात अाहेत. कर्नाटकातील भक्तांना साेलापूर-पुणे-नगरमार्गे तर तेलंगणातील भक्तांना नांदेड, अाैरंगाबाद, मनमाड, शिर्डी असा प्रवास करावा लागताे. ज्यात वेळ अाणि अार्थिक खर्चही अधिक हाेताे. तेव्हा या दृष्टीने विचार करत उस्मानाबाद (येडशी) बीड असा लाेहमार्ग जळगाव- साेलापूर मार्गाचा अर्धा भाग हाेऊ शकताे.
देशाच्या पश्चिम भागात ग्रँड सेंट्रल मार्ग हाेईल
देशाच्या पूर्व भागात म्हणजे दक्षिण ते उत्तर भारत जाेडणारा चेन्नई ते नागपूर असा एक सिटी ग्रँड सेंट्रल रुट (मार्ग ) अाहे. या मार्गाला समांतर देशाच्या दक्षिण-उत्तर असा पश्चिम भागातून जाणारा जळगाव- साेलापूर हा रेल्वे मार्ग जळगाव-जालना- बीड- उस्मानाबाद-तुळजापूर-साेलापूर असा जाेडला गेल्यास निश्चितपणे हा दक्षिण-उत्तरेला जाणारा जयपूर-बंगलाेर सिटी ग्रँड सेंट्रल रुट (मार्ग) निर्माण हाेऊ शकतो.
जालना-औरंगाबाद उद्योगास बळकटी
जालना येथील स्टील इंडस्ट्री महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर अाहे. येथून तयार हाेणारे लाेह विशेषत: लाेह सळया वितरण मालवाहू ट्रकद्वारे थेट कर्नाटकपर्यंत जाते. या वाहतुकीचा रेल्वेला फायदाच हाेऊ शकताे. इतकेच नव्हे तर पश्चिम बंगाल अाणि नागपूरच्या बुटी बाेरी या नामांकित उद्याेग क्षेत्रातील लाेह उत्पादन अाणि पश्चिम बंगालमधील माेठ्या प्रमाणातील कास्ट आयर्न यांची वाहतूक भुसावळमार्गे जालना- अाैरंगाबाद-बीड-उस्मानाबाद-साेलापूर मार्गे कर्नाटकात जाते. हा रेल्वे मार्ग झाल्यास उद्याेगजकांचा वेळ, पैसा अाणि सुरक्षित माल वाहतुकीचे नवे दळण-वळणाचे जाळे निर्माण होऊन बळकटी मिळू शकेल.
११२ किलोमीटर बीड ते उस्मानाबाद अंतर
येडशी ते बीड हा ८० किलोमीटर अंतराचा मार्ग जोडल्यास नगरकडील पश्चिम महाराष्ट्रातील व्यावसायिक व प्रवाशांना यांना दक्षिणेकडे जाणे अधिक सोयीचे होईल.
पत्रकार परिषद घेऊन मांडली मागणी
स्वातंत्र्यसैनिक रेल्वे मागणी आंदोलन समितीच्या वतीने मंगळवारी शहरातील हॉटेल अन्विता येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी निमंत्रक क्षीरसागर बोलत होते. परिषदेस मन्मथ हेरकर, अरुण डाके, सुरेश मेखे, विलास बडगे, स्वातंत्र्यसैनिक बन्सीधर जाधव, सत्यनारायण लाहोटी, हिरालाल सारडा, जवाहर सारडा, सय्यद नवीदुज्जमा, मंगेश लोळगे, शांतीलाल पटेल, वाय. जनार्दन राव, सुनील परभणे यांच्यासह समिती पदाधिकारी उपस्थित होते.बीड ते उस्मानाबाद अंतर केवळ ११२ किलोमीटर असून त्यातील उस्मानाबाद ते येडशीपर्यंत २२ किलोमीटर लोहमार्ग कार्यरत असल्याने
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment