नवी दिल्ली- शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तारिक अन्वर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तसेच अन्वर यांनी लोकसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.
रफाल खरेदी घोटाळ्यावर शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर अन्वर नाराज होते. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेवर सवाल उपस्थित करणे योग्य नाही. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता की, मोदींवर रफाल खरेदी घोटाळ्याप्रकरणी आरोप करणे चुकीचे आहे. पवारांनी मोदींची भरभरून प्रशंसा केल्यानंतर ताकिर अन्वर यांची पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. सोबतच तारिक अन्वर यांनी लोकसभेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता.काॅंग्रेसमध्ये जाणार...सूत्रांनुसार, तारिक अन्वर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता तारिक अन्वर यांचा राजीनामा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment