0
जयपूर- जकार्ता येथील १८ व्या एशियन गेम्समध्ये भारतीय पुरुष संघाने राेइंगच्या क्वाड्रपल स्कल्स प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. भारताने या स्पर्धेच्या इतिहासातील हे दुसरे सुवर्णपदक पटकावले. अत्यंत खडतर प्रवासातून भारतीय संघाने यंदा हा साेनेरी यशाचा पल्ला गाठला. यामध्ये नाशिकच्या दत्तू भाेकनळसह स्वर्ण सिंग, सुखमीत सिंग अाणि अाेमप्रकाशचे माेलाचे याेगदान ठरले. त्यांनी मेहनतीतून भारताला हे पदक मिळवून दिले.
  • त्तूचा संघर्ष; वडिलांसाेबत विहीर खाेदण्याचे करत हाेता काम 
    नाशिकचा दत्तू भाेकनळ याची घरची अार्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची हाेती. त्यामुळे त्याला घर चालवण्यासाठी वडिलांना मदत करावी लागेल. यासाठी ताे अापल्या वडिलांसाेबतच दुसऱ्यांची विहीर खाेदण्यासाठी जात हाेता. कधी-कधी ताे दगडफाेडीचेही काम करत हाेता. दरम्यान, वडिलांच्या मृत्यूमुळे त्याला वयाच्या ९ व्या वर्षापासून या सर्व जबाबदाऱ्यांना सामाेरे जावे लागले. त्यामुळे त्याला कधी-कधी पेट्राेल पंपावरही काम करावे लागले. दरम्यान, त्याने सैन्य दलात भरती झाला. येथूनच त्याच्या करिअरला चालना मिळाली. या ठिकाणी मिळालेल्या संधीचे साेने करत त्याने भारतीय संघात स्थान मिळवले. त्याने रिअाे अाॅलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केलेे.

    अाईच्या अाग्रहाने लागली शिक्षणाची गाेडी, नाहीतर मजुरीच करत राहिला असता 
    स्वर्ण सिंग हा शिक्षणात थाेडा कच्चा हाेता. त्याला यामध्ये अावड नव्हती. त्यामुळे ताे नेहमीच याकडे दुर्लक्ष करत हाेता. यापासून सुटका व्हावी म्हणून ताे वडिलांसाेबत शेतातच मजुरीसाठी जाऊ लागला. मात्र, हीच बाब अाईने दूर केली. तिने त्याला वेळाेवेळी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. वेळप्रसंगी त्याला मारहाणही केली. यातूनच त्याला याची गाेडी निर्माण झाली अाणि ताे अभ्यासात तरबेज हाेऊ लागला. तसेच त्याला व्हाॅलीबाॅलची अावड निर्माण झाली. यातील अव्वल कामगिरीच्या बळावर त्याला फिटनेस चांगला ठेवता अाला. यातूनच त्याची २००८ मध्ये सैन्य दलात निवड झाली. त्यानंतर ताे राेइंगकडे वळला. त्याने लंडन अाॅलिम्पिकसाठीची पात्रताही पूर्ण केली हाेती.

    शेतात राबराब राबणाऱ्या वडिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी सुखमीतची मेहनत 
    शेतकरी कुटुंबातील सुखमीतला लहानपणापासूनच संघर्ष करावा लागला. त्याचे वडील शेतामध्ये राबराब राबत हाेते. माेलमजुरीच्या अाधारे घर चालवत हाेते. मात्र, वडिलांना करावे लागत असलेले कष्ट सुखमीतला बघवत नव्हते. त्यामळे त्याने प्रचंड मेहनत घेतली अाणि २०१४ मध्ये सैन्य दलात भरती हाेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पहिल्याच प्रयत्नात त्याला यश मिळाले. यामध्ये त्याची राेइंगसाठीही निवड झाली अाणि त्याने मेहनतीच्या अाधारे या खेळातही विशेष प्रावीण्य संपादन केले. अाई अाणि वडिलांना सुखाचे दिवस अाणून देण्यासाठीच्या मेहनतीला फळ मिळाल्याने समाधानी असल्याचे ताे म्हणाला.

    पाेहणे येत नसतानाही वळला राेइंगकडे, अाता अाेमचा दबदबा 
    भारतीय संघातील अाेमप्रकाश हा २०१० मध्ये सैन्य दलात दाखल झाला. त्याची उंची माेठी अाणि शरीरयष्टीही धडधाकट हाेती. त्यामुळेच काेच धर्मेंद्र संगवान अाणि ग्वांगझू गेम्स २०१० मधील चॅम्पियन बजरंगलाल ताखड यांनी स्वत: अाेमप्रकाशला राेइंगमध्ये करिअर घडवण्याचा सल्ला दिला. यादरम्यान त्याला पाेहतादेखील येत नव्हते. त्यामुळे त्याचा याला नकार हाेता. दरम्यान, बजरंगलाल यांनी त्याला पुन्हा एकदा चांगले समजावून सांगितले. यातून त्याचे मतपरिर्वतन झाले अाणि ताे याकडे वळला. त्याने मार्च २०११ मध्ये राेइंगला सुरुवात केली. त्याला २०१४ मध्ये भारतीय संघाकडून ग्वांगझू येथील स्पर्धेत सहभागी हाेण्याची संधी मिळाली.
    18th Asian Games at Jakarta news updates

Post a Comment

 
Top