0
अमृतसर - एका महिलेचे पतीसोबत भांडण झाल्यानंतर ती घरातून निघून वेगळी राहू लागली. यादरम्यान महिलेचे एका डॉक्टरशी शारीरिक संबंध बनले. यानंतर विवाहिता गर्भवती झाली. गर्भवती झाल्यानंतर डॉक्टर तिचा गर्भपात करू लागला, परंतु यादरम्यान तिची प्रकृती गंभीर झाली. यातच तिचा मृत्यू झज्ञला. पोलिसांनी याप्रकरणी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
असे आहे प्रकरण...
महिलेच्या कुटुंबातील सदस्यांच्या मते, त्यांची मुलगी पतीशी भांडण झाल्यानंतर सुल्तानविंड रोड परिसरात किरायाच्या घरात राहत होती. काही दिवसांपूर्वी तिची ओळख डॉ. मान सिंहसेाबत झाली. डॉक्टर चब्बा गावात दवाखाना चालवतो.
सूत्रांनुसार, पतीपासून वेगळी झाल्यानंतर महिलेची डॉक्टर मान सिंहसोबत मैत्री झाली. दोघेही एकत्र राहू लागले. त्यांच्या शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. याचदरम्यान महिला गर्भवती झाली. यावर डॉक्टरने तिला गर्भपात करण्यास सांगितले. डॉक्टर महिलेचा स्वत:च गर्भपात करू लागला, परंतु यादरम्यान महिलेची प्रकृती एवढी बिघडली की, तिचा मृत्यू झाला.
महिलेच्या मृत्यूमुळे घाबरला डॉक्टर
डॉक्टरने पोलिस आणि कुटुंबीयांना माहिती देण्याऐवजी महिलेचा मृतदेह कापडात गुंडाळून सुल्तानविंड रोडवरील शहीद उधमसिंह नगर परिसरात मोकळ्या मैदानात फेकून दिला. बी डिव्हिजन पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी डॉ. मान सिंहविरुद्ध सदोष मनुष्यवध, गर्भपात करणे, पुरावे नष्ट करणे आणि कट रचल्याच्या आरोपांवरून गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी डॉक्टर फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

अवैध संबंधांमुळे गर्भवती झाली विवाहिता, मग डॉक्टरने जे केले धक्कादायक होते

  • Married Women Death During Abortion By Doctors Mistake In Punjab

Post a comment

 
Top