0
मॉस्को - रशियात एका मातेने आपल्या पोटच्या अवघ्या 8 महिन्यांच्या बाळावर धारदार चाकूने हल्ला केला. ही महिला आपल्या मित्रांसोबत घरात पार्टी करत होती. त्यात भुकेने व्याकूळ असलेला चिमुकला रडत होता. त्याच्या रडण्याच्या आवाजाचा सख्ख्या आईला इतका राग आला की तिने किचनच्या चाकूने त्या बाळाच्या गळ्यावर आणि पोटावर वारंवार प्रहार केले. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.
 • मित्रांसोबत पार्टी करत होती आई
  - रशियातील उरुसू शहरात ही घटना घडली आहे. येथे राहणारी अॅडलिना खेरनासोव्हा आपल्या बॉयफ्रेंड आणि एका महिलेसोबत पार्टी करत होती. किचनमध्ये दारु पीत असताना लाऊट म्युझिकमध्ये त्यांचा धिंगाणा सुरू होता. त्याचवेळी तिला वारंवार आपल्या बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. तिचे बाळ शेजारच्याच रुममध्ये भुकेने व्याकूळ होते. 
  - थोड्या वेळातच अॅडलीना आणि तिच्या बॉयफ्रेंडचे वाद झाला. वाद इतके पेटले की शिवीगाळ सुरू झाली. त्याचवेळी तिचा मुलगा पुन्हा मोठ-मोठ्याने रडत होता. बॉयफ्रेंडसोबत भांडण आणि त्यात बाळाच्या रडण्यावर ती इतकी संतापली की रागात तिने किचनमधील चाकू उचला. यानंतर थेट बाळाच्या रुममध्ये जाऊन त्याच्या गळ्यावर आणि पोटात सपा-सप वार केले. 
  - याच दरम्यान तिची मैत्रिण रुममध्ये गेली आणि तिने बाळाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. तिनेच महिलेला दूर ढकलून पोलिस आणि रुग्णवाहिका बोलावली.

  बाळ गंभीर, होणार फक्त 2 वर्षांची शिक्षा
  चाकू हल्ल्यात बाळाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. डॉक्टरांना त्याला शरीरभर टाके द्यावे लागले. सध्या तो जगण्याची झुंज देत आहे. तरीही डॉक्टरांनी त्याच्या जीवाला धोका नाही असे स्पष्ट केले आहे. महिलेला पोलिसांनी अटक करून कोर्टात सादर केले. तसेच तिला पोलिस कोठडी देण्यात आली आहे. रशियातील कायद्यानुसार, तिला 2 वर्षांची कैद होऊ शकते. सोबतच, तिला यापुढे कधीही आपल्या बाळाची भेट घेऊ दिली जाणार नाही.

  बॉयफ्रेंडसोबत भांडण आणि त्यात बाळाच्या रडण्यावर ती इतकी संतापली की रागात तिने किचनमधील चाकू उचला.

  • Drunk partying mum stabbed baby because he woke up and started crying

Post a comment

 
Top