- रांची- बिहारचे माजी मुख्यमंत्री व राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांनी चारा घाेटाळ्याच्या तीन प्रकरणांत गुरुवारी सिव्हिल काेर्ट परिसरातील सीबीअायच्या दाेन वेगवेगळ्या विशेष न्यायालयांत शरणागती पत्करली. त्यानंतर न्यायालयाने त्यांची थेट कारागृहात रवानगी केली. तेथून त्यांना उपचारासाठी रिम्समध्ये नेण्यात अाले. चाईबासा, देवघर व दुमका काेषागारातून अवैधरीत्या निधी काढल्याच्या प्रकरणांत ते शरण अाले. या तिन्ही प्रकरणांत त्यांना शिक्षा ठाेठावण्यात अाली अाहे.
गुरुवारी न्यायालयात अाल्यानंतर ते काेर्टरूममध्ये सुमारे तासभर गप्प बसून राहिले. उच्च न्यायालयाने पॅराेलचा कालावधी वाढवण्याची लालूंची याचिका २५ अाॅगस्टला फेटाळून लावत ३० अाॅगस्टपर्यंत शरण येण्याचे अादेश दिले हाेते. त्यानुसार ते बुधवारी संध्याकाळी पाटण्याहून रांचीला अाले. कारागृहात त्यांच्यासाठी उच्च श्रेणीच्या खाेलीची व्यवस्था करण्यात अाली अाहे. तसेच कारागृहाच्या रुग्णालयातही एक बेड तयार केला असून, जेवण तयार करणे व कपडे धुण्यासाठी लालूंना कारागृहात एक-एक कैदी पुरवला जाईल. दरम्यान, लालूप्रसाद यादव यांना गुरुवारची रात्र राजेंद्र इन्स्टिट्यूट अाॅफ मेडिकल सायन्समध्येच (रिम्स) घालवावी लागेल. या प्रकरणांचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसून, सध्या केवळ कागदाेपत्री कारवाई सुरू अाहे.
काय झाले न्यायालयात?
लालूंनी सर्वप्रथम चाईबासा काेषागारातून अवैधरीत्या निधी काढल्याच्या प्रकरणात सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस.एस.प्रसाद यांच्या न्यायालयात शरणागती पत्करली. तसेच तेथे प्रकृतीची माहिती देऊन अापल्याला पटियाला न्यायालयाने समन्स बजावल्याचे न्यायाधीशांना मोबाइल दाखवून सांगितले. उद्या तेथे हजर व्हायचे अाहे; परंतु मला कारागृहात पाठवले जात अाहे. माझी प्रकृती बरी नसल्याने मी तेथे कसा जाऊ शकेन? असे अापल्या खास अंदाजात लालूंनी न्यायालयाला सांगितले. त्यावर प्रकृतीचे काय, ती तर खराब होतच असते. ही त्या ईश्वराची इच्छा अाहे, असे न्यायालयाने सांगितले. याबाबत लालूंचे वकील प्रभातकुमार यांचा युक्तिवाद एेकून न्यायालयाने त्यांना शरणागती पत्करल्याचे प्रमाणपत्र दिले व पटियाला न्यायालयात हे प्रमाणपत्र दाखवू शकता, असे स्पष्ट केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment