0

1986 मधील आशिया कपच्या वेळी दाऊक भारतीय टीमच्या ड्रेसिंग रूमपर्यंत पोहोचला होता.

स्पोर्ट्स डेस्क - आशिया चषकात रविवारी होऊ घातलेल्या भारत-पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या वन डे मॅचकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. क्रिकेटच्या इतिहासावर नजर टाकता रेकॉर्डबरोबरच अंडरर्व्ल्डशी असलेल्या संबंधांमुळेही क्रिकेटची मोठ्या प्रमाणावर चर्चा झालेली आहे. त्यात दुबईत सामने होत असल्याने या आठवणी अधिक प्रकर्षाने डोकावतात. मग तो मॅच फिक्सिंगचा प्रकार असो वा सट्टाबाजार. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी संबंधित असेच काही किस्से आहेत. पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय टीमला कार गिफ्ट करण्याची ऑफर हाही त्यापैकीच एक किस्सा.


ड्रेसिंग रूमपर्यंत पोहोचला होता दाऊद 
ही घटना 1986 मधील शारजाह येथे झालेल्या ऑस्ट्रल-एशिया चषकाची आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान सामना सुरू होणार होता. त्याचवेळी भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये एक व्यक्ती आली. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून कुप्रसिद्ध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम होता. पण अभिनेता महेमूदने दाऊदची ओळख एक उद्योगपती म्हणून करून दिली होती. 
पाकिस्तानचा पराभव केल्यास गिफ्ट करणार होता कार 
ड्रेसिंग रूममध्ये दाऊदने भारतीय टीमला एक ऑफर दिली होती. जर भारताने पाकिस्तानचा पराभव केला तर टीममधील प्रत्येक सदस्याला कार गिफ्ट करणार असल्याचे तो म्हणाला होता. भारताचा कर्णधार कपिल देवने मात्र त्यावेळी ती ऑफर नाकारली होती. पण त्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा एका गड्याने पराभव केला होता. 
कपिल दाऊदला म्हणाला होता गेट आउट 
जेव्हा दाऊद ड्रेसिंग रूममध्ये आला त्यावेळी कपिल सामन्यापूर्वी होणाऱ्या पत्रकार परिषदेत बोलत होता. प्रेस कॉन्फरन्स संपल्यानंतर जेव्हा कपिल देव ड्रेसिंग रूममध्ये आला त्यावेळी दाऊदने त्याला त्याच्या ऑफरबाबत सांगितले. त्यावर कपिल चांगलाच भडकला. तो दाऊदला 'गेट आऊट' असेही म्हणाला. त्यामुळे रागावलेल्या दाऊदने ऑफर रद्द केली आणि तो विषय त्याठिकाणीच संपला. 
वेंगसरकरांनी केला होता खुलासा 
जळगावमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असताना दिलीप वेंगसरकर यांनी याबाबत खुलाला केला होता. ते म्हणाले होते की, दाऊद ड्रेसिंग रूममध्ये अभिनेता महेमूदबरोबर आला होता. त्याआधी त्यांनी दाऊदचा फोटोही पाहिलेला होता. त्यामुळे त्यांनी दाऊदला ओळखले. 
Dawood Ibrahim Tried To Buy Indian Cricket Team Players

Post a comment

 
Top