नवी दिल्ली - आशिया प्रशांत क्षेत्रात मँगखुट वादळाचा परिणाम चांगला होईल. हवामान विभागाने हा दावा केला आहे. विभागाच्या मते, मँगखुटमुळे नैऋत्य मान्सूनचा कालावधी वाढेल. त्यामुळे देशाच्या पूर्व, ईशान्य, मध्य आणि उत्तर भागांत पावसाचा अतिरिक्त टप्पा अनुभवायला मिळू शकतो. हवामान विभागाच्या वैज्ञानिक सुनीतादेवी म्हणाल्या की, फिलिपाइन्सनंतर मँगखुट पश्चिमेकडे वळले आहे. पुढील तीन दिवसांत ते भारताच्या पूर्व किनाऱ्यावर धडकू शकते. वादळाची गती धीमी आहे, त्यामुळे किनारपट्टीवर चक्रीवादळासारख्या धोक्याची शक्यता नाही. बंगालच्या खाडीत तयार होत असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राला मँगखुट प्रभावित करेल. त्यामुळे देशात नैऋत्य मान्सूनच्या परतण्याच्या कालावधीत सुमारे एक आठवड्याची वाढ होऊ शकते. वादळाचे फिलिपाइन्समध्ये ४९, अमेरिकेत १३ बळीफिलिपाइन्समध्ये मँगखुट वादळामुळे झालेल्या दुर्घटनांतील मृतांची संख्या ४९ झाली आहे.वादळाच्या मार्गात ५० लाखांवर लोक अडकलेले आहेत. मँगखुटने रविवारी हाँगकाँग आणि दक्षिण चीनकडे कूच केले. त्यामुळे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांचा फिलिपाइन्सचा दौरा रद्द झाला. चीन आणि फिलिपाइन्सने १५० उड्डाणे रद्द केली. हाँगकाँग ऑब्झर्व्हेटरीने म्हटले की, वादळाचा प्रभाव अजूनही वेगवान आहे. ते वेगवान वारे आणि पाऊस सोबत आणत आहे. दरम्यान, अमेरिकेत फ्लॉरेन्स वादळामुळे झालेल्या दुर्घटनांत बळी गेलेल्यांची १३ झाली आहे. हवामान विभागाने पाऊस आणि पुराचा इशारा दिला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment