0
श्रीनगर/ नवी दिल्ली- पाक सीमेवर जखमी बीएसएफ जवानावर अत्यार करून त्याची हत्या केल्याच्या तिसऱ्याच दिवशी शुक्रवारी काश्मिरातील शाेपियात तीन पाेलिसांचे अतिरेक्यांनी अपहरण करून त्यांची हत्या केली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या भारताने पाकिस्तानसाेबत न्यूयॉर्कमध्ये हाेणारी चर्चा तातडीने रद्द केली.


पाकच्या अाग्रहामुळे भारताने संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनात या चर्चेसाठी हाेकार दिला हाेता, मात्र २४ तासांत निर्णय बदलला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी सांगितले, 'इम्रान खानचा खरा चेहरा उघड झाला. अाम्ही चर्चेसाठी तयारी दर्शवल्यानंतरही अामच्या जवानांची हत्या झाली. दुसरे म्हणजे पाकने अतिरेक्यांचा गाैरव करण्यासाठी त्यांच्यावर टपाल तिकीट जारी केले.'
उलट्या बाेंबा : म्हणे भारताला चर्चाच करायची नाही 
एकीकडे भारताशी चर्चेचा प्रस्ताव देताना दुसरीकडे दहशतवादाला अाश्रय देणाऱ्या पाकिस्तानने अाता चर्चा रद्द झाल्यानंतर भारतावरच अाराेप केले आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी म्हणाले, 'भारतातील एका गटाला अामच्याशी चर्चा हाेऊ नये असेच वाटते. भारतात पुढील वर्षी हाेणाऱ्या निवडणुकांच्या 'तयारीला' हे लाेक लागले अाहेत असे वाटते. पाकिस्तानने भारताशी चर्चेसाठी पुढाकार घेतला हाेता, मात्र भारताकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. जर त्यांना चर्चेची इच्छाच नसेल तर अाम्ही तरी कशाला इतकी घाई करणार अाहाेत?'

पाेलिसांच्या राजीनाम्याचे वृत्त केंद्राने फेटाळले 
तीन पाेलिसांच्या हत्येनंतर सहा पाेलिसांनी राजीनामा दिल्याचे वृत्त अाहे. याबाबत व्हिडिअाे साेशल मीडियावर शेअर झाले. मात्र, पाेलिसांनी त्याबाबत पुष्टी दिली नाही. केंद्रीय गृह मंत्रालयानेही एकाही पाेलिसाने राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले अाहे.

पाच अतिरेकी मारले 
काश्मिरात घुसखाेरी करणाऱ्या पाच अतिरेक्यांना शुक्रवारी जवानांनी ठार केले. उत्तरी काश्मीरच्या बंदीपाेरा जिल्ह्यात सुमबलर भागात ही चकमक झाली. या पाचही अतिरेक्यांनी नियंत्रण रेषा अाेलांडून भारतीय सीमेत प्रवेश केला हाेता. काश्मिरात वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचे त्यांचे नियाेजन हाेते.
India has canceled talks with Pakistan after the killing of soldiers, police

Post a comment

 
Top