0
  • कुरनूल - आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला तर पंतप्रधान म्हणून पहिली स्वाक्षरी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या फाईलवर करेल, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी म्हटले आहे. मंगळवारी आंध्रप्रदेशच्या कुरनूल येथे बोलतान राहुल गांधींनी हे आश्वासन दिले आहे.


    मीडिया रिपोर्ट्सनुसार राहुल गांधी यावेळी असेही म्हणाले की, काँग्रेस भेट म्हणून नव्हे तर जनतेच्या प्रती असलेली जबाबदारी म्हणून विशेष राज्याचा दर्जा प्रदान करणार आहे. लोकांना केलेली आश्वासने आमच्या लक्षात असतात असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. काही कारणास्तव जर मला माझे हे आश्वासन पाळता आले नाही तर आंध्रप्रदेशमध्ये पाय ठेवणार नाही, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.
    राहुल गांधी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोलही केला. विजय माल्ल्या, अनिल अंबानी यांना सरकार कशाप्रकारे मदत करत आहे आणि जनतेचा पैसा लूटवत आहे, यावरूनही राहुल गांधींनी टीका केली.

Post a comment

 
Top