मुंबई- मुंबईतील वडाळा येथे क्षुल्लक कारणावरून एका तरूणाने वृद्ध व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फुलचंद यादव असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून शाकीरअली शेख असे आरोपीचे नाव आहे.मिळालेली माहिती अशी की, वडाळा संगमनगर येथे राहणारे फुलचंद यादव शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास शौचाला गेले होते. ते नैसर्गिक विधी आटोपत असताना शौचालयात रांगेत उभे असलेल्या आरोपी शकीर अलीने दरवाजा जोराने ठोठावला. फुलचंद यांनी शकीरला थोडा वेळ थांबण्यास सांगितले. मात्र, हे ऐकून शाकिरचा राग अनावर झाला. फुलचंद विधी उरकून बाहेर पडताच दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. प्रचंड संतापलेल्या शाकीरने फुलचंद यांना बेदम मारहाण केली. शाकीरने फुलचंद यांना शेजारी असलेल्या उघड्या नाल्यात फेकून दिले. पाण्यात बुडून फुलचंद यांचा मृत्यू झाला.सांनी शाकीरअली सरमुल्ला शेख याला अटक केली आहे
याप्रकरणी वडाळा टीटी पोलि.

Post a Comment