कोल्हापूर- मुलीला चॉकलेट दिल्याने गावकर्यांनी एका विद्यार्थ्याला नग्न करून त्याची गावातून धिंड काढण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर गावकर्यांनी विद्यार्थ्याला जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाणही केली. यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरसंगी गावातील हा गंभीर प्रकार घडला आहे. पीडित विद्यार्थ्यावर नेसरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आजरा पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे.पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी मुलीचा काका आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले आहे. दोन गटातील वातावरण आणखी चिघळू नये यासासाठी शिरसंगी गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Post a Comment