0
पुणे- मुठा उजवा कालवा सिंहगड रस्त्यावर दांडेकर पुलाजवळ गुरुवारी सकाळी 11 वाजून 15 मिनिटांला फुटला. दांडेकर पूल परिसरातील रस्त्यांना पाणीच पाणी झाले आहे. लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. पोलिस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. डागडुजी न झाल्याने कालव्याची भिंत कोसळ्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
खडकवासला धरणातून पुणे शहराला आणि पुढे जिल्ह्याच्या पूर्व भागात या कालव्यातून पाणी पुरवठा करण्यात येतो. कालव्याची तातडीने डागडुजी करण्‍याचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी दिले आहेत.
झोपडपट्टीत शिरले पाणी...
कालवा फुटल्याने सिंहगड रस्त्यांला नदीचे रुप आले असून झोपडपट्टीमध्ये पाणी शिरले आहे. दांडेकर पूल परिसरात लोकांचे पूर्ण संसार पाण्यात वाहून गेला आहे. बहुतेकांच्या घरात पाणी शिरले आहे. अनेक वाहने पाण्याच्या प्रवाहात अडकली.

Post a comment

 
Top