0
 • नवी दिल्ली- हुंड्यासाठी छळ केला जाण्याच्या प्रकरणांत आता आरोपीस तत्काळ अटक होऊ शकेल. सुप्रीम कोर्टाने अशा अटकेसाठी दिलेल्या स्थगिती आदेशात शुक्रवारी सुधारणा केली. या प्रकरणात द्विसदस्यीय न्यायपीठ सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय न्यायपीठाच्या मताशी सहमत नव्हते. त्यामुळे कोर्टाने यावर पुनर्विचार केला होता आणि २३ एप्रिल रोजी निकाल राखून ठेवला होता.


  त्रिसदस्यीय न्यायपीठाने आपल्याच निकालात बदल करून पीडितेच्या सुरक्षेच्या दृष्टीने आरोपीस तत्काळ अटक गरजेची असल्याचे नमूद केले. मात्र, यासोबतच आरोपींना अटकपूर्व जामिनाचा पर्याय ठेवला.

  कुटुंबकल्याण समिती नकोच
  हुंड्यासाठी छळ होत असल्याची प्रकरणे हाताळण्यासाठी एक कुटुंबकल्याण समिती नेमली जावी, असे पूर्वीच्या आदेशात नमूद होते. या समितीच्या अहवालाआधारे आरोपीला अटक केली जावी, असेही निर्देश होते. मात्र, आता अशा समितीची गरज नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे
  .
  supreme court modifies its order on dowry harassment

Post a comment

 
Top