- पुणे- माणिकबाग येथील पेट्रोल पंपासमोर तरुणाचा निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अक्षय गडशी (वय-23) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहीहंडी फ्लेक्स लावण्याच्या वादातून हे हत्याकांड झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेली माहिती अशी की, अक्षय आणि आरोपी एकाच भागातील आहेत. काही दिवसांपूर्वी आरोपी आणि अक्षय यांच्यात दहीहंडीचा फ्लेक्स लावण्यावरून वाद झाला होता. त्या वादातून पाच जणांच्या टोळक्याने मध्यरात्री माणिकबाग येथील पेट्रोल पंपासमोर अक्षयला गाठून त्याच्यावर तलवारीने वार करून त्याची हत्या केली.शहरात दहीहंडी मंडळाकडून मोठ-मोठे शुभेच्छा आणि आयोजित कार्यक्रमाचे फ्लेक्स लावले जात आहेत. त्यातून दोन गटात किरकोळ वादही होत आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment