0
नॅशनल डेस्क/ नवी दिल्‍ली - पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे आम आदमी त्रस्त झाला आहे, यामुळे योगगुरू बाबा रामदेव म्हणाले की, जर त्यांना परवानगी मिळाली, तर ते पेट्रोल-डिझेल 35 ते 40 रुपये लीटरमध्ये विकू शकतात. रामदेव NDTV च्या कार्यक्रमात पोहोचले होते. तेथेच त्यांना पेट्रोल-डिझेलच्या दरांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
काय म्हणाले होते बाबा रामदेव?
दोन दिवसांपूर्वीच रामदेव बाबांनी स्वस्त दूध विकण्याची सुरुवात केली होती. यामुळे टीव्ही अँकरने त्यांना विचारले की, पतंजलि ग्रुप डीझेल-पेट्रोल का विकत नाही. यावर रामदेव म्हणाले- 'जर सरकारने मला असे करण्याची परवानगी दिली आणि टॅक्समध्ये काही सूट दिली, तर मी भारताला 35-45 रुपये लीटरमध्ये पेट्रोल-डिझेल देऊ शकतो.' ते म्हणाले- 'पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांचा पुढच्या वर्षीच्या निवडणुकांवर परिणाम होईल. वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली पाहिजेत.'Video Baba Ramdev Claims That He Can Sell Petrol Upto 35 Rupees Per Litre

Post a Comment

 
Top