0
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या बोस्टनमध्ये नॅचरल गॅसच्या पाइपलाइनमध्ये गुरुवारी 70 विस्फोट झाले. यामुळे 6 जण जखमी झाले. दोन जणांची प्रकृती गंभीर बनलेली आहे. शेकडो लोकांना घराबाहेर काढण्यात आले. लॉरेंस, एंडोवर आणि नॉर्थ एंडोवर परिसरात आग विझविण्यासाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांना खूप मेहनत करावी लागली. जास्त विस्फोट होऊ नये, यासाठी वीज कापण्यात आली. तपास अधिकारी म्हणतात की, पाइपलाइनमध्ये जास्त दाब झाल्याने विस्फोट झालेले असू शकतात.

एंडोवर फायर डिपार्टमेंटचे चीफ मायकल मेंसफील्ड म्हणाले- ही एक मोठी घटना होती. अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. आम्ही एका घरात आग विझवित असताना दुसऱ्या घरात आग लागत होती. सर्व सुरळीत होण्यासाठी एका आठवड्यापेक्षाही जास्त काळ लागेल.
घरांमध्ये पसरत गेली आग :
न्यू हैंपशायरचे अग्निशमन अधिकारी जॉन मॅकआर्डल म्हणाले, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 50 अग्निशमन विभागांना लावण्यात आले आहे. नॉर्थ एंडोवरच्या एका महिलेने सांगितले की, तिच्या घराजवळ 3 इमारतींमध्ये आग लागली होती. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन जवानांनी पूर्ण परिसराला घेरले. पाइपलाइन कोलंबिया गॅस कंपनीची आहे. अधिकारी म्हणाले की, पूर्ण राज्यात पाइपलाइनला अपग्रेड केले जाईल. तथापि, कंपनीने हे सांगितलेले नाही की, ज्या परिसरात विस्फोट झाले, तेथे लगेच काही दुरुस्तीचे प्रयत्न झाले अथवा नाही.
नागरिकांना घराबाहेर राहण्याचे आवाहन: 
कोलंबिया गॅसचे प्रवक्ते केन स्टेमेन म्हणाले- पाइपलाइनमध्ये विस्फोट कसे झाले, याची आम्ही चौकशी करत आहोत. नॉर्थ एंडोवरचे टाउन मॅनेजर म्हणाले की घरांमध्ये गॅस आहे. पुढची सूचना येईपर्यंत लोकांना घराबाहेर राहण्यासाठी सांगण्यात आले आहे.
70-explosion-in-gas-pipeline-in-boston-6-injured-hundreds-evacuated

Post a comment

 
Top