0
 • india versus england test match in london
  लंडन - यजमान इंग्लंड संघाने शनिवारी भारताविरुद्ध पाचव्या कसाेटीच्या पहिल्या डावात धावांचा डाेंगर रचला. कुक अाणि माेईनपाठाेपाठ अाता जाेस बटलरने (८९) शानदार अर्धशतक झळकावले. याच्या बळावर इंग्लंडने दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ३३२ धावा काढल्या.

  प्रत्युत्तरात भारताची निराशा झाली. अाघाडीच्या अव्वल फलंदाजांच्या अपयशामुळे भारताने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ५१ षटकांत ६ गड्यांच्या माेबदल्यात १७४ धावा काढल्या अाहेत. अद्याप १५८ धावांनी पिछाडीवर असलेल्या भारताकडे ४ विकेट शिल्लक अाहेत. युवा फलंदाज हनुमा विहारी (२५) अाणि रवींद्र जडेजा (८) हे दाेघेही मैदानावर खेळत अाहेत. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन, अाणि स्टाेक्सने प्रत्येकी दाेन विकेट घेतल्या. तसेच ब्राॅड अाणि सॅम कुरनने प्रत्येकी एक बळी घेतला. त्यामुळे भारतीय संघाचा माेठ्या खेळीचा प्रयत्न अपयशी ठरला.
  काेहलीचे अर्धशतक हुकले : भारताचा कर्णधार विराट काेहलीचे अर्धशतकाचे स्वप्न भंगले. यापासून एका पावलावर असताना त्याला स्टाेक्सने रुटकरवी बाद केले. त्यामुळे त्याने ४९ धावांची खेळी केली.
  राहुल ठरला एकमेव
  लाेकेश राहुल हा मालिकेत अव्वल गाेलंदाज ठरला. त्याने यजमान इंग्लंडविरुद्ध या पाच कसाेटी सामन्यांच्या मालिकेत एकूण १३ झेल घेतल्या. ब्राॅडला बाद करून त्याने १३ वी झेल घेतली. असे करणारा ताे भारताचा एकमेव अाहे.

Post a comment

 
Top