0
नवी दिल्ली - जर सर्वकाही ठीक झाले तर दिल्लीत लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील. दिल्लीमध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टी (AAP) सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट दरांमध्ये कपात करण्याचे मनावर घेतले आहे. आणि याची घोषणाही मंगळवारी होऊ शकते. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर चंदिगड आणि उत्तर भारतातील 5 राज्यांच्या अर्थमंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची मंथन बैठक सुरू झालेली आहे. बैठक सकारात्मक राहिली तर दिल्लीसहित 5 राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची दाट शक्यता आहे.

बैठकीत हरियाणाचे अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यु, पंजाबचे अर्थमंत्री मनप्रीतसिंह बादल आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांच्याशिवाय उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि चंदिगडच्या वित्त विभाग तसेच कराधान विभागातील अधिकारी उपस्थित आहेत.
सूत्रांनुसार, जर निर्णय घला तर ही कपात 3 ते 4 टक्क्यांपर्यंत असू शकते. यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर दीड ते दोन रुपये प्रति लीटरपर्यंत कमी होतील. दिल्ली वित्त विभागातील एका अधिकाऱ्याच्या मते, याबाबत जवळजवळ सर्वसहमती झालेली आहे. जर सर्वकाही ठीक राहिले तर मंगळवारी व्हॅट कपातीची घोषणा होऊ शकते. यासोबतच पेट्रोल-डिझेलचे दरही काही कमी होतील.

5 राज्यांच्या अर्थमंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची मंथन बैठक सुरू

  • Petrol prices May Soon Drop In 5 States Of India

Post a comment

 
Top