0
धनबाद (झारखंड) : मंगळवारी बरवाअड्डा येथे झालेल्या गँगरेप प्रकरणातील आरोपींच्या अटकेनंतर, जो क्रूरपणा समोर आला आहे, त्यामुळे सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक आरोपीने या प्रकरणात स्वतःची भूमिका सांगितली. आरोपी परितोषने रांचीवरून तरुणीला घेऊन धनबादकडे निघाल्यानंतर आपल्या मित्रांना फोन करून सांगितले की, 'घेऊन येत आहे, तयार राहा.' मंगळवारी सकाळी लोकांनी पीडितेला पाहिले आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. 27 तासानंतर ती शुद्धीवर आली. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.
 • arrested Four boys for accused molesting girl caseयेथे जाणून घ्या, या क्रूरपणात कोणी कोणते घृणास्पद काम केले...

  1. परितोष
  काय करतो : रांची येथे मिठाईच्या दुकानात काम करतो 

  आरोप : पोलीस याला गँगरेपचा मास्टर माइंड सांगत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, परितोषनेच मुलीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून धनबादला आणले होते. त्यानंतर तिला मित्रांच्या हवाली केले.

  2. प्रकाश हाजरा
  काय करतो : बेरोजगार 

  आरोप : पोलिसांच्या मते याने रेप केल्यानंतर सर्वत जास्त क्रूरपणा केला. पीडिता बेशुद्ध झाल्यानंतर तिला फरफटत ओढत नेले. दगडाने तिच्या चेहऱ्यावर वार केले. यामुळे पिडीतेचे दात तुटले.
  3. गुड्डू कुमार
  काय करतो : गार्ड आहे

  आरोप : याने दारू पिऊन सर्वात पहिले रेप केला. त्यानंतर त्याच्या सर्व मित्रांनी रेप केल्यानंतर तिला मारून टाकण्याची धमकी दिली. यांच्या सांगण्यावरूनच तिघांनी तिच्यावर हल्ला केला.

  4. कुंदन हाजरा 
  काय करतो : प्रायव्हेट लाईट वर्कर आहे
   
  आरोप : यानेही नशेमध्ये रेप केला. प्रकाश आणि गुड्डूसोबत युवतीला फरफटत ओढून नेले. नंतर डोक्यावर दगडाने मारले. मित्रांसोबत मिळून तिला झाडांमध्ये फेकून दिले.

  पीडितेने जीव वाचवल्याबद्दल धनबाद पोलिसांचे मानले आभार
  शुद्धीवर आल्यानंतर वेदनेने व्हिवळत असलेल्या पीडितेने धनबाद पोलिसांना धन्यवाद म्हटले. तिने सांगितले की, योग्य वेळेला मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले नसे तर माझा मृत्यू निश्चित होता. मी आज फक्त पोलिसांमुळे जिवंत आहे. पीडितेच्या मोबाईलमधून परितोषचा नंबर मिळाला. त्यानंतर इतर तीन आरोपींसोबत परितोषचे संभाषण झाल्याची पुष्टी झाली.

Post a comment

 
Top