व्यभिचार गुन्हा नाही!
- 150 जुने कलम 497 रद्द झाले आहे. आता व्यभिचार किंवा विवाहबाह्य संबंध गुन्हा ठरवले जाऊ शकणार नाही. एवढेच नव्हे, तर व्यभिचार प्रकरणात पती किंवा पत्नीला त्या आधारावर घटस्फोट घेता येईल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
- घटनापीठाच्या निकालानुसार, पती हा पत्नीचा मालक नाही. महिलेला सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार हवा. सोबतच, भारतात महिला आणि पुरुष कायद्यापुढे समान असल्याने व्यभिचार आणि विवाहबाह्य संदर्भातील कलम 497 रद्द करण्यात आले आहे.
काय होती मागणी?
सर्वोच्च न्यायालयात 150 वर्षे जुन्या व्याभिचार संदर्भातील कायद्यावर महत्वाचा निकाल जाहीर झाला. या कायद्यात विवाहबाह्य संबंधांमध्ये पुरुषांना दोषी धरले जात असले तरीही महिलांना शिक्षेची तरतूद नाही. महिलांवर यामध्ये कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होत नाही. यात महिला आणि पुरुषांना समान वागणूक दिली जात नाही. सोबतच, या कायद्याने विवाहाची पवित्रता सुद्धा टिकत नाही. त्यामुळे हा कायदा बाद करण्यात यावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.
तत्पूर्वी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय घटनापीठाने ऑगस्ट महिन्यात या सुनावणीवरील निर्णय राखून ठेवला होता. न्यायमूर्ती आरएफ नरीमन, न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांचाही समावेश असलेल्या घटनापीठाने 1 ऑगस्टपासून सलग सहा दिवस या प्रकरणी सुनावणी घेतली होती. या जुन्या कायद्यात विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या महिलेवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. मग, यातून विवाहाची पवित्रता कशी टिकून राहील असा जाब कोर्टाने सरकारला विचारला होता.
नेमका कसा होता हा कायदा..?
भारतीय दंड विधानाच्या कलम 497 मध्ये व्याभिचाराचा उल्लेख करण्यात आला आहे. या कायद्यानुसार, एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या पत्नीसोबत त्या पुरुषाच्या मंजुरीने किंवा मंजुरी न घेता शारीरिक संबंध प्रस्थापित करत असेल तर अशा प्रकारचे शारीरिक संबंध बलात्कार नाहीत. तेव्हा ती व्यक्ती व्याभिचार प्रकरणी दोषी ठरवली जाईल. या कायद्यात पुरुषांना दोषी मानले जात असले तरीही महिलांनी विवाहबाह्य संबंध ठेवल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची तरतूद नव्हती. महिलेने विवाहबाह्य संबंध ठेवल्यास त्या आधारावर पती फक्त घटस्फोट घेऊ शकतो. निकालानंतरही विवाहबाह्य संबंधांना घटस्फोटाचे कारण मानले जाईल. 
Post a Comment