0
पुणे - गणेश भक्तांना आकर्षण असलेल्या पुण्यातील श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन सकाळी 4.30 दरम्यान करण्यात आले. दरवर्षीच्या तुलनेत काही तास आधी या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. दरवर्षी दगडुशेट हलवाईची मिरवणुक अलका चौकात येण्यास 7 वाजत होते. पण यंदा लवकर मिरवणुकीत सहभागी झाल्याने, वेळेत बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
त्याआधी शहरातील मानाच्‍या पाचही गणपतींचे ढोल ताशांच्‍या गजरात विसर्जन करण्‍यात आले आहे. पुण्‍यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसह मानाचे पाच गणपती हे नेहमीच भक्‍तांच्‍या आकर्षणाचे प्रमुख केंद्र राहिले आहेत. यात मानाचा पहिला गणपती कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्‍वरी, गुरूजी तालीम, तुळशीबाग गणपती आणि केसरवाडा गणपती या गणपतींचा समावेश आहे.
Updates
- मानाचा पहिला कसबा गणपतीचं दुपारी 4.05 वाजता विसर्जन
- मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं संध्याकाळी 4.55 वाजता विसर्जन
- मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचं संध्याकाळी 5.30 वाजता विसर्जन
- मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचं संध्याकाळी 6.45 वाजता विसर्जन
- मानाचा पाचवा केसरी वाडा गणपतीचं संध्याकाळी 7.10 वाजता विसर्जन
- सर्वप्रथम मानाचा पहिला कसबा गणपतीच्या आरतीने विसर्जनाच्या मिरणुकीला सुरुवात झाली.
- कसबा गणपती पाठोपाठ मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी आणि मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम यांच्याही विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
- मिरणुकीत हजारो भाविकांनी दर्शनासाठी केली गर्दी
- पुण्यात मानाचे पाचही गणपती विसर्जनासाठी रवाना
- मानाचे 4 गणपती महात्मा फुले मंडईत दाखल
- डीजे, डॉल्बींना बंदी असल्याने पारंपारिक ढोल-ताशांसह निघाल्या मिरणुका
- शहरातील मानाचा पहिला कसबा गणपतीचे विसर्जन करण्‍यात आले आहे.Pune Ganesha Visarajan Live News And Updates

Post a Comment

 
Top