- सासाराम - बिहारच्या सासाराम जिल्ह्यात 4 जणांनी शनिवारी एका दलित महिलेला जादू-टोण्याच्या संशयात बेदम मारहाण करून ठार मारले आहे. ही घटना अंबेडकर चौकला लागून असलेल्या दलित वस्तीमध्ये घडली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींपैकी 3 जणांना अटक केली आहे. त्यांना कोर्टात हजर केले असता पोलिस कोठडी देण्यात आली. तत्पूर्वी बिहारच्याच बेगुसराय जिल्ह्यात संतप्त जमावाने 3 अपहरणकर्त्यांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून ठार मारले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वनाथ राम आणि त्याची पत्नी माला देवी यांचा शेजारीच राहणारे रंगबहादुर डोम, रामवतार डोम आणि हीरामुनी देवी यांच्याशी वाद सुरू होता. मालाच्या मुलांनी आपल्या आई-वडिलांच्या सततच्या आजारपणासाठी जादू-टोण्याला जबाबदार धरले होते. आपले शेजारीच जादूटोणा करून असे घडवत आहे असा त्यांचा समज होता. यावरून त्यांनी शेजारी राहणाऱ्या एका युवकाला मारहाण केली. त्याचा सूड उगवण्यासाठी शेजारच्या 4 जणांनी मिळून माला देवीला बेदम मारहाण केली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी माला देवीला मृत घोषित केले. या प्रकरणात रंगबहादुर डोम, रामावतार डोम आणि हीरामुनी देवी यांना अटक करण्यात आली आहे.4 दिवसांपूर्वीच झाली होती दगडफेक
चार दिवसांपूर्वी मंगळवारी दोन्ही गटांमध्ये एकमेकांवर दगडफेक तसेच मारहाण सुद्धा झाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिस सुद्धा जखमी झाले होते. या दगडफेकीच्या दोन दिवसांपूर्वीच माला - देवीच्या पतीचे गंभीर आजारामुळे निधन झाले होते. ते एका स्थानिक महाविद्यालयात कर्मचारी होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment