0
  • औरंगाबाद - आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांचे भारिप बहुजन महासंघ युती करून राज्यातील निवडणूका लढणार आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी या युतीची माहिती दिली आहे. 2 ऑक्टोबरला महात्मा गाधी जयंतीच्या निमित्ताने औरंगाबादेत जबिंदा लॉन्सवर युतीची पहिली एकत्र सभा होणार आहे.
    दरम्यान, 2 ऑक्टोबरला सकाळी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांची बैठक होईल. यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या पुण्यातील निवसस्थानी या युतीबाबत दोन बैठका झाल्या आहे. प्रकाश आंबेडकर या युतीचे नेतृत्व करणार आहे. राज्यातील दलित आणि मस्लिम मते एकत्रित करण्याचा प्रयत्न या युतीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे कॉग्रेसला सर्वात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
    या युतीच्या माध्यामातून दोन्ही पक्ष राज्यातील महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीला समारे जाणार आहे. युतीचा पहिला प्रयोग हा अहमदनगर पालिकेच्या निवडणुकीत करण्यात येणार आहे. या युतीमुळे राज्यातील राजकारणाचे समिकरणे बदलण्याची शक्यता आहे.Alliance of MIM and Prakash Ambedkar's Bharipa Bahujan Mahasangh

Post a comment

 
Top