0
  • यावल (जि. जळगाव)- एटीएसच्या पथकाने गुरुवारी दुपारी यावल तालुक्यातील साकळी (जि. जळगाव) येथून वासुदेव सुर्यवंशी या २८ वर्षीय तरुणास चौकशीसाठी ताब्यात घेतले.


    कर्की (ता.मुक्ताईनगर) येथील मूळ रहिवासी आणि सध्या साकळी येथे मामाच्या गावी राहणारा वासुदेव हा सनातनचा साधक असल्याची चर्चा आहे. गुरुवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास गावात दोन वाहनांद्वारे दाखल झालेल्या एटीएसच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. यानंतर एका वाहनात वासुदेवला बसवून पथक नाशिककडे निघाले, तर दुसऱ्या वाहनातील पाच अधिकाऱ्यांच्या पथकाने त्याचे घर बंद करून अडीच तास झाडाझडती घेतली. त्यात सनातनशी संबंधित काही कागदपत्रे, सीडी त्यांना आढळली. साकळी हे त्याच्या मामाचे गाव आहे. वडिलांचे निधन झाल्यानंतर तो साकळीला राहण्यास आला. गॅरेजचा व्यवसाय करून तो उदरनिर्वाह करतो. या कारवाईविषयी गोपनीयता पाळत पथकाने माहिती देण्यास नकार दिला.
    पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...28 year old youth arrested by ATS in jalgao

Post a Comment

 
Top