0
नाशिक- शिक्षक भरतीवरील बंदी उठवावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मागील राज्यभरातील प्राध्यापक मंगळवारपासून काम बंद आंदोलन करणार आहे. दोन महिन्यांत तब्बल पाच वेळा राज्यस्तरीय आंदोलने करूनही महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या एकाही मागणीची पूर्तता होऊ शकली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा संघटनेने अांदाेलनाची हाक दिली अाहे. या आंदोलनाला राज्यातील काही शिक्षण संस्थाचालकांनीही पाठिंबा दिला आहे.
  • महासंघातर्फे यापूर्वी ६ ऑगस्टला काळ्या फिती लावून शिक्षक मागणी दिन पाळला. त्यानंतर २० ऑगस्ट रोजी उच्चशिक्षण सहसंचालकांच्या कार्यालयासमोर प्राध्यापक प्रतिनिधींनी उपस्थित राहून निदर्शने केली. २७ ऑगस्ट रोजी पुण्याच्या उच्चशिक्षण संचालकांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतरही मागण्यांची पूर्तता होऊ न शकल्याने ४ सप्टेंबरला हजारो प्राध्यापकांनी प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या आवारात राज्यव्यापी जेलभरो आंदोलन केले. त्यानंतर पुन्हा ११ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व नियमित, कंत्राटी, सीएचबी प्राध्यापकांनी एकदिवसीय सामूहिक रजा आंदोलन केले. दरम्यान, मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने या वेळी दिला आहे.Professors strike from today in the state

Post a comment

 
Top