0
ऑटो डेस्क - TVSची नवी स्कूटर Ntorq 125 भारतीय ग्राहकांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे. कंपनीने या स्कूटरच्या एक लाखाहून जास्त युनिटची विक्री केलेली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, 22 लाखाहून जास्त जण स्कूटरच्या ऑफिशियल वेबसाइटवर व्हिजिट केलेली आहे. आणि त्यांना ग्राहकांचा उदंड प्रतिसादही मिळत आहे. तथापि, TVS ने तरुणाईला ध्यानात घेऊन याची डिजाइन केलेली आहे. यात अनेक अॅडव्हान्स फीचर्सही दिलेले आहेत. याच्या स्पीडोमीटरला स्मार्टफोनशी कनेक्ट केले जाऊ शकते. या स्कूची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 59,712 रुपये आहे. तथापि, कंपनीने ही स्कूटर फेब्रुवारीत लाँच केली होती.


95kmph आहे टॉप स्पीड
या स्कूटरमध्ये 125cc चे सिंगल-सिलिंडर एअर-कूल्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे. याची मॅक्सिमम पॉवर 9.5bhp आहे. ही 7,500 rpm आणि 10.5 Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, याची टॉप स्पीड 95kmph आहे. दुसरीकडे, ही फक्त 0 ते 9 सेकंदांत 60kmph चा वेग घेऊ शकते.
SmartXonnect डिजिटल मीटर
या स्कूटरमध्ये SmartXonnect डिजिटल मीटर देण्यात आले आहे, जे 55 प्रकारची डिटेल तुम्हाला देईल. यात मीटरला ब्लूटूथ आणि अॅपच्या मदतीने स्मार्टफोनशी कनेक्ट करू शकतात. म्हणजेच तुम्ही स्कूटरशी संबंधित इन्फॉर्मेशन आपल्या फोनवरही पाहू शकता. दुसरीकडे, हे नेविगेशनचेही काम करते. आतापर्यंत इतर कंपन्यांच्या स्कूटरमध्ये अशा प्रकारचे फीचर आलेले नाही.
कॉलची डिटेल मिळेल
SmartXonnect ला राइडर आपल्या फोनशी कनेक्ट करू शकतील. यानंतर इनकमिंग कॉल अलर्ट, इनकमिंग SMS अलर्ट, मिस्ड कॉल अलर्ट आणि फोन सिग्नल स्ट्रेंथही डिस्प्ले होईल. एवढेच नाही, तुम्हाला स्मार्टफोनच्या बॅटरीचे डिटेलही येथे मिळतील. दुसरीकडे, SMSचा हा ऑटो रिप्लायही देईल. या प्रकारचे मीटर अनेक महागड्या आणि लक्झरी कारमध्ये असते.
हे फीचर्सही मिळतील
TVS Ntorq 125 मध्ये LED लाइट आणि टेल लाइटही LED आहे. यात फ्यूएल टँक बाहेरच्या बाजूला देण्यात आला आहे. सेफ्टीसाठी यात फ्रंट टायरमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. दुसरीकडे, अलॉय व्हीलसोबतच ट्यूबलेस टायरही देण्यात आलेले आहेत. याची फ्यूएल टँक कपॅसिटी 5 लीटर आहे. स्कूटरमध्ये टेलिस्कोप सस्पेंशन देण्यात आलेले आहे. हे चार कलर व्हेरिएंट रेड, यलो, व्हाइट आणि ग्रीनमध्ये येते. हे सर्व मेटॅलिक कलर्स आहेत.
TVS Ntorq 125 Automatic Scooter Achieves One Lakh Sales In India Video

Post a Comment

 
Top