यामुळे 2 दिवस साजरी केली जाईल जन्माष्टमी
काशीचे ज्योतिषाचार्य पं. फौजदार तिवारी यांच्यानुसार श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला रात्री 12 वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. यामुळे जन्माष्टमीचे व्रत 2 सप्टेंबरला करावे. परंतु वैष्णव संप्रदाय उद्व्यापिनी तिथीमध्ये व्रत-उत्सव साजरे करतात यामुळे 3 सप्टेंबरलाही जन्माष्टमी साजरी केली जाईल.
2 सप्टेंबरला रात्री सुरु होईल अष्टमी तिथी
भोपाळचे ज्योतिषाचार्य पं. प्रह्लाद पंड्या यांच्यानुसार अष्टमी तिथी रात्री 8.52 पासून सुरु होईल आणि रोहिणी नक्षत्र 08.06 पासून लागेल. या दिवशी शैव संप्रदायाचे लोक जन्माष्टमी साजरी करतील. याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 सप्टेंबरला सूर्योदयापासून रात्री 8 वाजेपर्यंत अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र राहील. उदय तिथी असल्यामुळे वैष्णव संप्रदायाचे लोक या दिवशी जन्माष्टमी साजरी करतील.
शैव-वैष्णव प्रथेमुळे दोन दिवस उत्सव
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं.आनंदशंकर व्यास यांच्यानुसार महादेवाला मानणारे शैव आणि विष्णू म्हणजे कृष्णाला मानणारे वैष्णव आहेत. शैव प्रथा पाळणारे लोक एक दिवस आधीच रात्री हा उत्सव साजरा करतात तर वैष्णव उदय तिथीनंतर साजरा करतात. यामुळे दोन्ही समुदायाचे लोक दोन दिवस उत्सव साजरा करतात. शैव मत अनादिकालापासून आहे तर वैष्णव मत 500 वर्षांपासून आहे.
Post a Comment