0
पुणे- पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील मुठा उजव्या कालव्याची भिंत गुरुवारी सकाळी अचानक कोसळून दांडेकर पूल परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या भागातील सर्व रस्त्यांवर पाण्याचे लोट वेगात वाहू लागले होते. अनेकांच्या घरांत, दुकानांत पाणी शिरल्याने तारांबळ उडाली. अनेक घरांच्या भिंतीला तडे गेले. त्यामुळे जीव मुठीत घेऊन लोकांना सुरक्षितस्थळी धाव घ्यावी लागली होती. दांडेकर पूल परिसरातील सुमारे 150 घरांतील दैनंदिन वापराचे साहित्य नदीपात्रात वाहून गेल्याने महिला तसेच कर्त्या पुरुषांच्याही डोळ्यात अश्रू तरळले.

दांडेकर पूल परिसरातील घरांचे मोठे नुकसान झाले आहे. बहुतांश घरांच्या भिंतीना तडे गेले आहेत तर रस्त्यावर पार्क केलेली वाहने वाहून गेली आहेत. कालच्या घटनेमुळे होत्याचे नव्हते झाले. आज आपला संसार पुन्हा उभा करण्यासाठी लोकांची पुन्हा धडपड सुरु झाली आहे.
मुलाच्या शिक्षणासाठी जमवलेले दीड लाखही पाण्यात
पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये हमाली करणारे सुरेश बोडेकर यांनी काबाडकष्ट करून आणि मित्रांकडून उधार-उसनवारी करून मुलाच्या शिक्षणासाठी जमवलेले दीड लाख रुपये घरात ठेवले होते. मुलाला जेईईचा क्लास लावून इंजिनिअर करण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र या पुरामुळे त्यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य व पैसेही वाहून गेले. आता मुलाला इंजिनिअर करणार कसे, असा प्रश्न बोडेकर कुटुंबीयांना पडला आहे.

कालच्या घटनेमुळे होत्याचे नव्हते झाले. आज आपला संसार पुन्हा उभा करण्यासाठी लोकांची पुन्हा धडपड सुरु झाली आहे.

  • Mutha Canal Wall Collapse Floods Dandekar Bridge Area In Pune

Post a comment

 
Top