0
ओस्लो - नॉर्वेत काही दिवसांपूर्वी 12 वर्षांच्या एका मुलीच्या कहाणीने खळबळ उडाली होती. मुलीने 37 वर्षीय पुरुषाशी केलेल्या लग्नाच्या तयारीपासून ते आपल्या प्रत्येक एक्स्पीरियन्सला ब्लॉग आणि वीडियोच्या माध्यमातून शेअर केले होते. व्हिडिओत लोक लग्नाचे ऐकून खूप भडकलेले दिसत होते. सर्व विरोध करत राहिले. परंतु लग्नाच्या दिवशी मुलगी चर्चमध्ये पोहोचली आणि तिने लग्नाला नकार देऊन सर्वांची मने जिंकली. हा व्हिडिओ आणि ब्लॉग मुलांच्या अधिकारांसाठी काम करणाऱ्या प्लान इंटरनॅशनल नावाच्या संघटनेने बनवला, त्यांनी बालविवाहाकडे याद्वारे अवघ्या जगाचे लक्ष वेधले.12 वर्षीय मुलीच्या लग्नाची तयारी
- 12 वर्षीय थियाने लग्नावरून आपल्या ब्लॉगवर केक, वेडिंग ड्रेस आणि वेडिंग रिंग या सर्वांचे फोटोज शेअर केले होते. आणि लग्नाची तारीखही लिहिली होती. यासोबतच वेडिंग ड्रेस, रिंग आणि केकचेही फोटोज टाकले.
- एका दिवसातच हा ब्लॉग देशात सर्वाधिक वाचला जाणारा ब्लॉग बनला होता. दुसरीकडे, ब्लॉगवर लग्नाची बातमी वाचून लोकांच्या रागाचा पारा चढला. सर्व प्रचंड टीका करू लागले होते.
- या लग्नावरून समाजात एवढा राग होता की, पोलिसांनाही याची माहिती कळवण्यात आली. तसेच चाइल्ड वेल्फेयर सर्व्हिसपर्यंत याची तक्रार करण्यात आली. दुसरीकडे, सोशल मीडियावरही यावरून मोठा वाद झाला. 
- तथापि, हे काही खरेखुरे लग्न नव्हते, तर बालविवाहावरून बाल अधिकारांसाठी काम करणाऱ्या एका संघटनेने हे तयार केले होते. जेणेकरून या प्रथेबाबत जनजागृती व्हावी.
मुलीच्या निर्णयाने जिंकली मने
- ब्लॉगवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओत थिया लग्नासाठी तयार होत होती. आणि मग वेडिंग गाउनमध्ये चर्चपर्यंत जाताना दिसते. व्हिडिओतही लोक विरोध करताना दिसत आहेत. 
- परंतु, थिया वेडिंगसाठी जशी चर्चमध्ये पोहोचते आणि पादरी तिला तिची मर्जी विचारतात, तेव्हा ती लग्नाला नकार देते आणि परत येते. मुलीच्या निर्णयाने आणि व्हिडिओचा शेवट पाहून सर्वांची मने ती जिंकून घेते.
ब्लॉग आणि व्हिडिओचा उद्देश
- हा व्हिडिओ आणि ब्लॉग बनवणाऱ्या प्लान इंटरनेशनलच्या टीमने म्हटले की, आम्ही बालविवाहाची भयंकर कुप्रथा दाखवू इच्छित होतो. 
- जगभरातील सत्य समोर आणण्यासाठी आम्ही या पद्धतीचा वापर केला. ही अत्यंत प्रभावी पद्धत आहे. यामुळे पुरेशी जनजागृती झाली आहे.
Video of 12 Year Old Girl Is About To Marry a 37 Year Old Man


Post a Comment

 
Top