0
कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये सन २०१६ नंतर पुन्हा एकदा पूल कोसळल्याची घटना घडली. माझेरहाटमध्ये एका उड्डाणपुलाचा भाग कोसळून अनेक गाड्या व लोक दबले गेले. दरम्यान, या दुर्घटनेत १ जण ठार व १९ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, प्रत्यक्षदर्शीनुसार एक मिनी बस आणि काही कारमधील लोक ढिगाऱ्यात दबले गेले.

> सुमारे ४० वर्षांपूर्वीच्या या पुलाचा भाग रेल्वे मार्गावर कोसळल्यामुळे शहरातील या भागातून होणारी लोकल रेल्वेची वाहतूक ठप्प झाली.
> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करून पीडित लोकांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केली.
> एप्रिल २०१६ मध्ये बांधकाम सुरू असलेला पूल कोसळून कोलकात्यात २७ जणांचा मृत्यू व ८० जखमी झाले होते.

पुढील स्‍लाइडवर पाहा, या दुर्घटनेचे फोटो...
pictures of kolkata flyover collapses in majerhat

Post a Comment

 
Top