नवी दिल्ली - मेहुल चौकसीला नागरिकत्व देण्याच्या अँटिग्वा सरकारच्या खुलाशानंतर शुक्रवारी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. राहुल यांनी ट्विट केले- "मिस्टर 56 इंचच्या सुटाबुटातल्या मित्राला (मेहुल) भारताने नोव्हेंबर 2017 मध्येच क्लीन चिट दिली होती. जेणेकरून त्याला अँटिग्वाचे नागरिकत्व मिळू शकेल." मेहुल चौकसी आणि नीरव मोदीवर PNB मध्ये 13 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
राहुल यांनी एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केला. यात आधी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद हे नीरव मोदी आणि मेहुल चौकसी प्रकरणात स्पष्टीकरण देताना दिसत आहेत. यानंतर मोदींची क्लिप आहे, ज्यात एका कार्यक्रमात ते मेहुल चौकसीला ‘मेहुल भाई’ संबोधतात.
भारताच्या क्लिअरन्सनंतरच देण्यात आले नागरिकत्व:
एक दिवसापूर्वीच अँटिग्वा सरकारने म्हटले होते की, हिरे व्यावसायिक मेहुल चौकसीला नागरिकत्व देण्यासाठी भारताच्या पोलिसांनी क्लियरेंस सर्टिफिकेट दिले होते. विदेश मंत्रालयाच्या मुंबई स्थित क्षेत्रीय पासपोर्ट ऑफिसनेही मंजुरी दिली होती. आम्हाला चौकसीविरुद्ध अशी कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती, जी त्याला व्हिसा वा नागरिकत्व देण्याविरुद्ध असेल. भारताच्या एखाद्या व्यक्ती वा संस्थेने त्याच्याविरुद्ध कोणताही आक्षेप नोंदवला नव्हता. चौकसीने मे 2017 मध्ये अँटिग्वाचे नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता.

Post a Comment