नवी दिल्ली - ब्रिटनच्या सिक्युरिटी एजन्सीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळचा जबीर सिद्दिक ऊर्फ जबीर मोती याला लंडनच्या एका हॉटेलमधून अटक केली आहे. सूत्रांनुसार, सध्या तो दाऊदसाठी ब्रिटन, यूएई, आफ्रिकासहित अनेक देशां
त डी-कंपनीच्या पैशांची देवाणघेवाण पाहायचा. त्याला दाऊदचा उजवा हातही मानले जाते. दाऊदवर फास आवळण्यासाठी भारताने जबीरला अटक करण्याचे आवाहन केले होते. जबीरवर ड्रग्ज तस्करी, खंडणी आणि इतर गुन्ह्यांत सहभागी असल्याचा आरोप आहे.

चारिंग क्रॉस पोलिसांना जबीरकडे पाकिस्तानी पासपोर्ट मिळाला आहे. यावर कराचीचा पत्ता लिहिलेला आहे. जबीरजवळ ब्रिटनचा 10 वर्षांचा व्हिसा होता. असे म्हणतात की, तो अँटिग्वाचे नागरिकत्व घेण्याच्या प्रयत्नात होता. दाऊद इब्राहिम 1993 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्ब ब्लास्टचा सूत्रधार आहे. सध्या तो पाकिस्तानच्या कराचीमध्ये राहतो. 2016 मध्ये भारतीय गुप्तचर संस्थांनी जबीर आणि दाऊदचा गुंड खालिक अहमददरम्यान फोनवर झालेल्या संभाषणाचा खुलासा केला होता. यावरून कळले होते की, खालिक हवालाच्या माध्यमातून पाठवलेले डी-कंपनीचे 40 कोटी रुपये घेऊन पळून गेला.
Post a Comment