0
फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता पाकिट, मोबाईल, चार्जर आणि इतर इलेक्ट्रॉनिक सामान बॅगमध्ये ठेवता येणार नाही. या सर्वाची एअरपोर्टवर स्वतंत्र तपासणी केली जाईल. आतापर्यंत चपासणीसाठी ट्रेमध्ये फक्त लॅपटॉप आणिटॅबलेटच ठेवले जात होते. पण आता वेगळ्या आकाराच्या पेनचीही तपासणी होईल. अनेक प्रकरणांत अशा पेनमध्ये चाकू लपवल्याचे पाहायला मिळाले आहे.


फ्लाइटमध्ये प्रवास करण्यापूर्वी किती सामान घेऊन जाता येईल याची माहिती असायला हवी. अशावेळी मनाई असलेले साहित्य म्हणजे अणकुचीदार वस्तू, शस्त्रे, लायटर, ब्लेड, कैची, विषारी रेडियो अॅक्टीव्ह आणि स्फोटक साहित्य. तुम्ही लहान मुलाबरोबर प्रवास करत असाल तर लहान मुलाचे बर्थ सर्टिफिकेटही सोबत ठेवा. फ्लाइटमध्ये नेण्यास मनाई असलेल्या वस्तुंची आम्ही आज माहिती देत आहोत. या वस्तू सोबत नेल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. क्रिकेट बॅट, बेसबॉल बॅट असे स्पोर्ट्स आयटम्स सामानाबरोबर ठेवू शकता. पण सोबत नेऊ शकत नाही.

या वस्तू विमानात नेऊ नका

वैयक्तिक वस्तूंवर बंदी 
लायटर, मेटलची कात्री, शस्त्रांसारखी खेळणी.

धारदार वस्तू 

बॉक्स कटर, आइस एक्स, कोणत्याही प्रकारचा चाकू, रेजर ब्लेड, कृपाण किंवा तलवार

क्रीडा साहित्य 
बेसबॉल बॅट, नेमबाजीतील तीर, कमाण, क्रिकेट बॅट, गोल्फ क्लब्स, हॉकी स्टिक्स, लॅक्रॉस स्टिक्स, स्पियर गन्स इत्यादी.

या शस्त्रांवरही बंदी 
स्फोटके, पिस्तुल, गन लाइटर, गन पावडर, पॅलेट गन, कोत्याही प्रकारचे शस्त्र, स्टार्टर पिस्तुल

ही अवजारे नेण्यासही बंदी 
कुऱ्हाड, सब्बल, ड्रिल, हतोडी, स्क्रू ड्रायव्हर, करवत इत्यादी.

ज्वलनशील पदार्थ 
एअरोसोल, इंधन, गॅसोलिन, गॅस टॉर्च, लायटर फ्लड, माचीस, पेंट थिनर

या केमिकल्सवलरही बंदी 
क्लोरीन, कॉम्प्रेस्ड गॅस सिलिंडर, लिक्विड ब्लीच, स्प्रे पेंट, टीअर गॅस
New policy about Prohibited and restricted baggage items in Airplane

Post a Comment

 
Top