वर्धा- समुद्रपुर तालुक्यातील गव्हा कोल्ही येथे संतोष अंबादे या युवकाच्या हत्याप्रकरणी साथीदार आरोपीला समुद्रपूर पोलिसांकडून अटक केली आहे. हत्या-प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यश आले असून, देवेंद्र उर्फ देवा मोहनलाल साहु वय ४६ वर्ष रा.लेबर कॉलणी हिंगणघाट याला अटक केली आहे.रविवारी १९ ऑगस्टला नरेद्र भगत यांच्या शेतातील विहिरित संतोष सुखदेव अंबादे यांचा मृतदेह आढळला होता. डोके, चेहऱ्यावरील मारावरून त्याची हत्या झाल्याचे निष्पर्ण झाले होते मात्र आरोपी फरार होते. गोपनिय माहिती नुसार मृतक संतोष अंबादे व आरोपी देवा साहु हे दोघेही हिंगणघाट येथील दारू विक्रेता दिपिन फुलझेलेसाठी दारू आणण्याचे काम करित होता. शुक्रवारी १७ ऑगस्टला संतोष व देवा हे दोघेही गव्हा ( कोल्ही ) येथील पारधी बेड्यावर दारु आणण्यासाठी गेले होते हे दारू आणण्यासाठी वाहनाचा उपयोग करित नव्हते ते मोहा दारुचे ब्लैडर खांद्यावर टाकून आणायचे त्यांनी दारू ब्लॅडरमध्ये घेतली व दोघांनीही रिचवली व जाण्यावरुन दोघात वाद झाला रात्री कालव्याजवळील नरेद्र भगत यांच्या शेताजवळ येऊन हाणामारी झाली तेथे तुडुंब विहारित पडले त्यावेळेस संतोष बाहेर निघून त्यांनी मोठा दगड घेऊन देवाच्या अंगावर टाकला परंतु देवा ने पाण्यात डुंबकी मारल्याने तो दगड देवाच्या पाठीला लागला यांच वेळीस देवा विहिरिच्या बाहेर येऊन संतोषला विहिरीत ढकलले आणि विहिरिच्या बाजूला लावलेल्या पायरीवरचे दगड उचलून मारण्यात सुरवात केली. त्यात त्याच्या डोक्यावर दगडाचा मार लागल्याने संतोषचा त्यातच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी रात्री १२ वाजेपर्यत विहिरीजवळ राहून रात्रीला घरी जावून रेल्वेनी वरोरा येथे गेला व तेथून बस पकडून चंद्रपुरला गेला व तेथुन रेल्वेनेच भिलाई येथे गेला हा आरोपी देवा याने रेल्वेमध्ये वेन्डर चे काम केल्यामुळे त्याला रेल्वे बदल ची पुर्ण माहिती होती त्यामुळे तो आठ दिवस रेल्वेने इकडुन तिकडे तिकडुन इकडे फिरत होता.

Post a Comment