माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. वाजपेयी यांच्या प्रकृतीबाबत एम्स रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन जारी केले आहे. यात 24 तासांमध्ये त्यांची प्रकृती अधिकच खाल्यावल्याचे अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर 11 जून 2018 पासून एम्समध्ये उपचार सुरू आहेत. किडनीच्या आजारानं त्रस्त असलेल्या 93 वर्षांच्या वाजपेयींची प्रकृती गंभीर आहे. याआधी महिन्याभरापूर्वीदेखील अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती खालावल्याचं एम्स रुग्णालयानं सांगितलं होतं. त्यावेळी त्यांना मूत्र संसर्ग झाला होता.

Post a Comment