0

नाशिक: नाशिकमधील कायदा सुव्यवस्थेची स्थिती अधिकच गंभीर बनत चालली असून आता थेट पत्रकारांवर हल्ले होण्यास सुरुवात झालीये. 'दिव्य मराठी' या दैनिकातल्या बातमीमुळं संतापलेल्या चार-पाच जणांच्या टोळक्यानं संदीप जाधव या रिपोर्टरला मारहाण केलीय. 
संदीप जाधव दिव्य मराठीत क्राइम रिपोर्टर असून आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिलांच्या वादाची बातमी त्यानं छापली होती. या बातमीमुळं बदनामी झाल्याचा राग डोक्यात घेऊन महिलेनं चार-पाच जणांच्या टोळक्यासह दिव्य मराठीच्या कार्यालयात जाऊन संदीपला लाथा बुक्क्यांनी अमानुष मारहाण केलीय. 
संदीप रक्तबंबाळ होईपर्यंत त्याला मारहाण करण्यात आली. तसंच ऑफिसमधील इतर कर्मचाऱ्यांनाही दमदाटी करत शिवीगाळ करण्यात आली. संदीप जाधवला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर हल्लेखोरांना सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलंय.  

Post a Comment

 
Top