- लंडन- सलामीच्या पराभवातून सावरत दुसऱ्या कसाेटीत दमदार सुरुवात करण्याच्या टीम इंडियाच्या अाशेवर शुक्रवारी पाणी फेरले गेले. नाणेफेक जिंकून यजमान इंग्लंडने दुसऱ्या कसाेटीत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाची निराशाजनक सुरुवात झाली. पावसाच्या सातत्याच्या व्यत्ययाचाही टीमला माेठा फटका बसला. दरम्यान, भारताने दुसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात दिवसअखेर ३५.२ षटकांपर्यंत १०७ धावांवर गाशा गुंडाळला. इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने घरच्या मैदानावर शानदार गाेलंदाजी करताना ५ विकेट घेतल्या. त्याने मुरली विजय अाणि लाेकेश राहुलला बाद केले. भारताचा सलामीवीर मुरली विजय पहिल्याच षटकात बाद हाेऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचा माेठ्या खेळीचा प्रयत्न अपयशी ठरला.
पावसाचे सावट असल्याने इंग्लंडचा कर्णधार ज्याे रुटने प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती दिली. या निर्णयाला वेगवान गाेलंदाज अँडसरनने याेग्य ठरवले. त्याने पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मुरली विजयला त्रिफळाचीत केले. त्यानंतर लाेेकेश राहुल बाद झाला. ताे मालिकेतील सलग तिसऱ्या डावात फ्लाॅप ठरला. त्याने ८ धावांची खेळी केली. अाता टीमला काेहलीकडून माेठ्या खेळीची अाशा हाेती. मात्र, त्यानेही सगळ्याची निराशा केली. त्याने २४ धावांचे याेगदान देऊन पॅव्हेलियन गाठले. दरम्यान रहाणेही (१८) फार काळ मैदानावर अाव्हान कायम ठेऊ शकला नाही.
चेतेश्वर पुजारा अाठव्यांदा धावबाद
टीम इंडियाचा चेतेश्वर पुजारा हा कसाेटी करिअरमध्ये दहाव्यांदा धावबाद झाला. यातील सात वेळा ताे स्वत: धावबाद झाला. अशा प्रकारच्या यादीत ताे चाैथ्या स्थानावर अाहे. यापूर्वी श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतंुगा (११ पैकी ८ वेळा), अाॅस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (२० पैकी १५ वेळा) अाणि श्रीलंकेचा समरवीरा (१४ पैकी ११ वेळा) बाद झाला.काेहलीने संघात केले महत्त्वाचे दाेन बदल
काेहलीने दुसऱ्या कसाेटीसाठी संघात दाेन महत्त्वाचे बदल केले. त्याने धवनला विश्रांती देत पुजाराला संधी दिली. वेगवान गाेलंदाज उमेश यादवच्या जागी कुलदीप यादवला सहभागी केले. गत सामन्यात तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करणाऱ्या लाेकेशला अाता सलामीची संधी दिली हाेती. मात्र, यातही ताे अपयशी ठरला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment