0
farmer committed suicide for maratha reservation
कडा- ‘माझ्यावर कर्ज असल्याने बँकेचा तगादा व मुलांना शिक्षणासाठी आरक्षण नाही. त्यामुळे आत्महत्या करत आहे’ अशा आशयाची चिठ्ठी लिहून ठेवत शेतकऱ्याने गळफास घेतल्याची घटना आष्टी तालुक्यातील शेरी खुर्द येथे सोमवारी पहाटे घडली.


भारत फक्कड ढोबळे (३६) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. अल्पभूधारक असलेल्या भारत यांनी स्वत:च्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेतला. कडा पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. या वेळी भारत यांच्या खिशात आपल्यावर कर्ज असल्याने बँकेचा तगादा व मुलांच्या शिक्षणासाठी आरक्षण नसल्याने आत्महत्या करत अाहे अशा आशयाची चिठ्ठी मिळून आली. भारत यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

Post a Comment

 
Top