0
यवतमाळ- वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रसुतीकरीता दाखल करण्यात आलेल्या महिलेने रविवारी दुपारी साडेबारा वाजता चार मुलींना जन्म दिला. महिलेसह चारही मुलींची प्रकृती चांगली असून, नवजात बाळांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात अाले अाहे. राणी प्रमोद राठोड असे प्रसूत झालेल्या महिलेचे नाव अाहे.
दारव्हा तालुक्यातील चिखली येथील राणी या गर्भवती महिलेवर काही दिवस दारव्ह्यातच उपचार करण्यात आला. दरम्यान, पाचव्या महिन्यात त्यांना यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारांकरिता आणण्यात आले. या वेळी डॉक्टरांनी केलेल्या सोनोग्राफीमध्ये तिच्या पोटात चार गर्भ असल्याची माहिती मिळाली. तेव्हापासून डॉक्टरांनी महिलेच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना कुटुंबीयांना दिल्या होत्या. नित्यनियमाने तपासणी करणे आणि औषध गोळ्या सेवन करण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला होता. या महिलेची विशेष काळजी घेण्याच्या दृष्टीने जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने पुढाकार घेतला.

संबंधित महिलेला शनिवारी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची विशेष काळजी घेतली. मागील दोन महिन्यापासून अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या मार्गदर्शनात डॉ. चव्हाण, डॉ. श्रीकांत वऱ्हाडे यांनी गर्भवती महिलेवर उपचार केले. रविवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास महिलेची सामान्य (नॉर्मल) प्रसूती झाली. त्यावेळी महिलेने चार मुलींना जन्म दिला. जन्मलेल्या 
woman gave birth to four daughters in Yavatmal

Post a Comment

 
Top